[२९५]                             ॥ श्री ॥      ५ आगस्ट १७६१.

 पे।। आश्विन शुद्ध ४ शके १६८३.

सेवेसि३३१ जोती गोपाळ व लक्ष्मण अंबाजी व कृष्णाजी भिकाजी व अंताजी कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना येथील वर्तमान तागाईत श्रावण शुद्ध १५ पर्यंत मु।। रायपूर स्वामीचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असे. विशेष. जेष्ठ शु।। ५ चें गांडापुराहून पत्र आलें ते आषाढ शु।। ४ स पावुलें. त्या आलीकडे आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तेणेंकरून चित्त सापेक्षित आहे. तरी तपशीलवार वर्तमान लिहावयासि आज्ञा केली पाहिजे. विशेष. उंमरगड गेल्यानंतर उभयतां रायपुरीं आहेत. इटावे येथीलहि ठाणें उठोन आलें. रोहिल्यांचे ठाणें बसलें. राजश्री गंगाधरपंत तात्या कोळेवर आहेत तसेच आहेत. जाटहि कोळेवर आहे. नजीबखान पाणीपतावर आहे. त्यात माधवसिंग व नजीबखान एकत्र जाहले आहेत. जाटाशीं बिगाड केला आहे. गंगापारच्या रोहिल्यांचें सूत्र जाटाकडे लागलें आहे. नजीबखान येकलाच वेगळा पडला आहे. जाटाचे मतें सुज्यातदौले यानीं वजीरी करावी, व गाजीदीखानानें बक्षीगिरी करावी. हें पातशाह अलीगोहर याच्या मनास येत नाहीं. गाजिदीखान अगदींच नसावा. आपल्या हातीं द्यावा. त्यास जाट देत नाहीं. यामुळें जाटाचें व त्याचें बिघडेल, असें दिसतें. गणेश संभाजी याणीं राजश्री बाबूराव कोनेर याजकीडल मामलत आपल्याकडे त्याचे तर्फेनें करून घेऊन झांशीस गेला, तेथें आहे. झांशीचा किल्ला हवालीं करून घेतला. किसोरसिंग उमरगडीं होता. त्यानें कामकाज चांगले उमरगडीं केलें. त्यास उमरगड सुटल्यावर तो येथें आला. त्यानें रदबदली केली कीं आपल्याकडे गांव आवरिया वगैरे आहेत, त्यांजपैकीं दहा हजार रुपये सालाबद घेतां ते माफ करावे. त्यावरून त्यास माफ करून सनद दिल्ही. सन सतराचें येणें होतें तेंहि माफ करून सतराचे सालापासून सनद करू दिल्ही. त्याजकडे कारकुनी दरसाल पांचशें रुपये द्यावे असा करार केला आहे. सन १८१८ चे सालापासून द्यावे असा करार करून चिटी लिहून घेतली आहे. सतराचें त्यानें सोडवून घेतलें. आह्मास ह्मणाले तें माफ करावें. पुढें आपली कारकुनी घ्यावी. मग आह्मीं शेंपन्नास कमजास्ती करून ठीक करून घेतलें. स्वस्त जाहले तरी येतील. कळावें. राजे रतनसा याजकडील वर्तमान पद्माकरपंतांनीं लिहिला आहे. त्यावरून सविस्तर कळेल. त्याजकडील शंभर रुपये मात्र दोनशेंपैकीं आह्मीं येथें घेतले आहेत. सीताराम बक्षीची जागड छ ६ जिलकादीं दूर केली. आणि त्यापैकीं चारशें स्वार व पांचशे प्यादे ठेविले, तेहि छ ६ जिल्हेजीं दूर केले. त्याची तलब तीन हजार रुपये न दिले. आमची कारकुनी अलीकडील एका महिन्याची न आली. पलीकडील अगदीं घेतली. परंतु त्यानीं चिट्या करून दिल्या आहेत. बारा तेराशें वसूल होणें आहेत. येतील तेव्हां खरे. कळावें. शिंद्यांच्या परगणियांचे हिशेब सरकारांत पाठवणें ह्मणून श्रीमंत राजश्री दादासाहेब ह्यांचे ताकीदपत्र आलें आहे. त्यास ते परभारा त्यांनीं सरकारांत भरावे किंवा आह्मीं घेऊन सरकारांत द्यावे याचें सरकारांत ठीक करून लिहून पाठवावें. येथील गृहस्थाचें मानस आहे कीं परभारें सरकारांत द्यावे. आह्मांकडे दाखला न द्यावा. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.