[२९४]                             ॥ श्री ॥        

विनंति. येथील प्रकार सांप्रत नवे घाट सर्वहि होतात. परंतु निश्चय हा काळपावेतों कामाकारभाराचा नाहीं. सातारेहून फिरोन येऊन मग येथील कामें चालतील. दिवस पुढील फार अवघड दिसत्या प्रकारांत दिसतात. कळावें. हे विनंति.