[२९३]                             ॥ श्री ॥        ९ जुलै १७६१.

स्ने।। दादो तानदेव कृतानेक सा॥ नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान त॥ आषाढ शुद्ध ८ पावेतों यथास्थित असे. विशेष. श्रीमंत राजश्री उभयतां नानांनीं पत्रें आपल्यास लिहिलीं आहेत त्याजवरून कळों येईल. मोगलाकडील वर्तमान तरी बेदरानजीक आहे. पंचवीस हजार फौज आहे. सरकारांत साठी लक्षांची जागीर घेतली तिची जफ्ती मांडिली आहे. तमाम कारकून उठविले. आपले बसविले. आपण मुलेंमाणसेंसुद्धा तेथें आहां. त्यांस औरंगाबादजवळ. याजकरितां तजविजीनें माणसें घेऊन आपण इकडे यावें. येविशीं श्रीमंत राजश्री नानांनीं आपल्यास लिहिलें आहे. आधीं तजवीज करावी. बहुतशी गडबड नाहीं तों तजवीज करावी. श्रीमंत राजश्री दाद व राजश्री माधवराव काल बुधवारीं वानवडीस गेले. आज तेथें मुकाम आहे. राजश्री चिटकोपंत नाना जेजूरीस गेले ते काल प्रातःकाळीं आले. उदईक थेऊरचा मु॥ आहे. नानाहि जातील. थोरले नाना स्वारीबरोबर जात नाहीं. ऐसें दिसतें. वरकढ नवलविशेष वर्तमान लिहिजेसें नाहीं. मोगलानें बळ बांधिलें आहे. श्रीमंत सातारा जाऊन सत्वरीच येणार. विदित जालें पाहिजे. सेवेसी श्रुत जालें पाहिजे. मुत्सदी अगदीं जातात. कळावें. सेवेसी विनंति.