[२७१] ॥ श्री ॥ २० डिसेंबर १७६०.
पु॥ राजश्री कारकून दिमत गोविंद बल्लाळ गोसावी यांसि:
सु॥ इहिदे सितैन मया अलफ. तुह्मीं दिल्लीस ऐवज आणिला आहे, त्यापैकीं बदल देणें पागा दिमत रंभाजी कदम यास मुदबाखाचे बेगमीबदल रुपये १५० रुपये तुह्माकडून देविले असेत. तरी पावते करून पावलियाचें कबज घेणें. जाणिजे. छ ११ ज॥लावल. आज्ञा प्रमाण ( लेखन सीमा ).