[२७०]                                    ॥ श्री ॥     १८ डिसेंबर १७६०.

राजश्री पांडुरंगपंत दि।। रा।। गोविंद बल्लाळ स्वामी सेवेसिः

सेवक नारो शंकर नमस्कार विनंति उपरि. राजश्री गोविंदपंत यांहीं श्रीमंताचा खजाना रुपये ४२०००० चार लक्ष वींस हजार तुह्मांकडून आमचे स्वाधीन करविला आहे. त्याजपे॥ राजश्री धोंडाजी नाईक नवाळे यास रुपये ५०००० पन्नास हजार देणें. कबज घेणें. छ ९ जमादिलावल. सु॥ इहिदे सितैन. बहुत काय लिहिणें. हे विनंति.