[२६७]                                      ॥ श्री ॥       १५ नोव्हेंबर १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री आप्पा स्वामींचे सेवेसिः-

पोष्य लक्ष्मण बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ कार्तिक सुध ७ भृगुवासर संध्याकाळ जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांची कासद जोडी आजुरदार पत्रें श्रीस, बलवडसिंग राजास व राजश्री मोरो बल्लाळ जोशी यांस पंत्रे होतीं. ते जोडी येथें पोटास मागावयास आले. त्यांनीं पत्रें सरकारी दाखविलीं. त्या पत्रांसमागमें दिवाकर जोशी ब्रह्मघाटी राहतात, त्यांस पत्र लश्करीहून त्यांचे बंधूचें आलें. तें पत्र वाचून त्याची नकल करून बजिन्नस अक्षरशा पाठविली. त्या पत्रावरून सविस्तर कळेल. लश्करचें सविस्तर वर्तमान लिहिलें आहे. कळावें. बहुत काय लिहिणें. लोभ कीजे. हे विनंति.

सेवेसि आपत्यें समान दामोदर मधसूदन सा॥ नमस्कार विनंति लिहिली. परिसो. लोभाची वृद्धि कीजे. हे विनंति.

सेवेसि विनंति सेवक माणको महादेव व हरी कृष्ण करद्वय जोडून साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना लिहिली. परिसोन कृपा कीजे. हे विनंति.