[२६६]                                      ॥ श्री ॥       ७ नोव्हेंबर १७६०.

 राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यांसिः

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. बद्दल देणें अजुरा खर्च प्रयागाहून गंगाजलाच्या कावडी दीनानाथ प्रयागवळ यांणीं मोहन कहार वगैरे अ॥ २५ याजबरोबर पाठविल्या त्याचा अजुरा दर कावडीस रुपये ६ प्रमाणें रुपये १५० दीडशें रुपये तुह्माकडून देविले असेत. प्रांत बुंदेलखंड वगैरे महाल येथील ऐवजीं पावते करून कबज घेणें. वरात हरदु मुसंन्ना मजुरा एक असे. जाणिजे. छ २८ र।।वल, सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.