[२०६] पे।। छ १० जिलकाद।। श्री ।। १९ जून १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः
पो॥ सवाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. येथें खर्चाची ओढ फारच जाहाली आहे. तुह्मी ऐवजाची तरतूद करून ऐवज सत्वर पाठवणें, ह्मणोन वारंवार लिहीत असतां, ऐवजाची तरतूद केली आहे. ऐसें मात्र शोभेस लिहिता. परंतु, ऐवज रवाना करीत नाहीं. हे गोष्ट उत्तम२८६ नसे. हालीं हें पत्र लिहिलें असे. तरी पेशजी लिहिल्या प्रें॥ ऐवज सत्वर पत्र पावतांच हुजूर रवाना करणें. विलंब एकंदर न लावणें. जाणिजे. छ ५ जिलकाद, सु।। इहिदे सितैन मया व अलफ. + बहुत काय लिहिणें. हे विनंति.