[१९४ अ ]                                        ।। श्री ।।              ३० मे १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो।।:-

पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. प॥ जलालीबिजराम व कसबे कासगज येथील कमाविस राजश्री अंताजी माणिकेश्वर२८० यांजकडे आहे ती त्यांजकडून दूर करून माहाल सरकारांत ठेऊन तुह्मांस जी सांगितली असे. तरी सनद पावतांच सदरहूप्रें॥ महालची जप्ती करून ऐवज सरकारांत जमा करणें. जाणिजे. छ १४ सवाल सु।। सितैन मया व अलफ. हे विनंति.