[९७] ।। श्री ।। ३० सप्टेंबर १७५७.
पे।। छ १५ मोहरम शुक्रवार दीड प्रहररात्रउर्वरित.
सेवेसि विनंति. सेवक शामजी गोविंद सा।। नमस्कार विनंति. येथील कुशल त।। छ १५ मोहरम शुक्रवार तिसराप्रहर स्वामीचे कृपादृष्टीकरून यथास्थित असे. यानंतर आज प्रातःकाळीं विनंतिपत्र पाठविले आहे तें पावलेंच असेल. दोन प्रहरा नवाब बसालतजंग नवाब निजामुदौलाचे डेरियास येऊन येक प्रहर उभयतां खिलवतेंत बसोन परस्परे सभाई होऊन आणशफत जाहाली ह्मणोन येक गृहस्थाचे द्वारें शोध लागला, त्यावरून विनंति लिहिली असे. राजश्री विठोजी सुंदर दिवाण बाळापुरीं, राजश्री येशवंतराव कानेरे व कृष्णाजी गोविंद यापासीं ऐवज आणावयाबद्दल राहिले होते, त्यास तुर्त दीड लाख रुपयाचा निकाल करून घेऊन आले. छ म।।रीं लष्करांत दाखल जाहले. विदित होय. हे विनंति.