तें करणें ह्मणोन लिहिलें.१४५ आशास याचे उत्तर केलें. जे श्रीमंताचा आमचा स्नेह तेव्हां जें करणें तें आह्मांस श्रीमंताचेच विचारें केलें पाहिजे. जे वेळेस आह्मी भागानगरीहून निघालों आणि वराडांत जायाचा कस्त केला त्या दिवसांत श्रीमंताचीं पत्रें पावलीं जे गंगातीर परियंत जाऊन दबाव घालावा. गंगापार न व्हावें दबावानेंच किल्ल्याचें काम करून घ्यावें. *बाबूराव१४६ कोन्हेर येतील. तह जाल्यावर तहाप्रें॥ वर्तावें. गंगापार होऊन गेले तरी आह्मांस तमाशा पाहतां नये. आह्मी समीप आहों. आह्मांसहि भोसल्याची कुमक करावी लागेल. जेव्हां श्रीमंताचीं लिहिलीं ऐशीं पावलीं मग पुढें कसें जावें? यास्तव श्रीमंतांचे आज्ञेप्रें॥ गंगातीरपरियंत जाऊन गिरमाजी खंडेराव यासी मागें सरवून जाधवरायाच्या तंबीकरिता चाललों ते वेळेस गिरमाजी१४७ खंडेरायापुरतें सामान पुष्कळ होतें. त्या वेळेस गिरमाजी खंडेराव यानें करारमदार परशुरामपंताचे मारफातीनें केला. जे आह्मी इतक्यावर गंगा उतरणार नाहीं. वराडांतच जातों. असें असतां आह्मांसच इलजाम श्रीमंतीं दिल्हा हें काय! आह्मी तरी त्यांचे आज्ञेप्रें॥ वर्तणूक केली. गिरमाजी खंडेरायानें करारमदार केले; परंतु आह्मी जाधवरायाचे तालुकियांत घुसलों तों त्यांनीं गंगा उतरून बेइमानी करून वरंगेल सरकार व येलगंदल सरकार व निर्मळ वगैरे कुलप्रांत धुळीस मेळविला. व इंदुराकडे फिरोन दुस-यानें आले. परगणे खराब करीत बसवड वैगैरे मुलूक हैदराबाद सुभ्याचा खराब करून पैसे मुबलक घेतले. तसेंच वसकतेवरून घासदाणे घेत परदूर प॥ लक्ष्मणराव खंडागळे याचे जागिरींत धसले. औरंगाबादेसमीप आले होते याप्रें॥ त्यांनीं बदमामली केली. वराडांत मनमानले पैसे घेतले. राजश्री बाबूराव कोन्हेर यासीं तह करावयासी पाठवणार होते त्यासी न पाठविलें. जे जे करार श्रीमंतासी केले त्यात येकाही अमलामधे याजकडून आला हें परिच्छिन्न कळून चुकलेंच आहे. छावणी आलजपुरची तरी होऊं सकत नाहीं. कां कीं फौजा कुल वाटे लाविल्या. जुने फौजेनशीं जाणें सलाह नाहीं. चित्तांत आहे जे रमजान आंदर जालियावर ईद करून हैदराबादेस यावें. तिकडे गेल्या वेगळे हुजूरचे फौजेस खर्चास मिळणें कठीण होईल. जरी पाण्यानें उघाड दिधली तरी हैदराबादेस जावें. नाहीं तरी औरंगाबादचीच छावणी जाली. छावणी औरंगाबादेस हो अथवा हैदराबादेस हो, परंतु दसरा जाल्यावर परिच्छिन्न रा॥ जानोजी भोसले यांसीं समजोन घेणें जरूर. त्याचें पारपत्य आवश्यक व चित्तानुरूप करावें व करितोंच, परंतु श्रीमंतीं मध्यें आणखी कांहीं न ह्मणावें त्याप्रें।। सांप्रत लिहिलें आहे. याच गोष्टीवर कायम असावें. फिरंग्यास मागें बोलावूं पाठविलेंच होतें व सांमतहि पत्र पाठविलेंच आहे जे तुह्मी लौकर येणें. पहिले पत्राचें उत्तर फिरंग्याकडून आले जे आह्मी छावणीस तुह्यापाशींच येतो, इकडे छावणी करीत नाही.