शि-यासाठीं आह्मांस मुरारराव याचें व पाळेगारांचे भय दाखवून लिहितात जे ते टपले आहेत, घेतील. श्रीमंतीं मुराररायास व पाळेगारांस ताकीद उत्तम प्रकारें केलिया त्यांची काय ताकद आहे जे वाकडी गोष्ट सांगू पहातील? ज्यानें वाकडी गोष्ट सांगितली त्यास शिक्षा करणें काय कठिण आहे ? फौजच त्या प्रांतीं ठेवणे तरी बहुत ठाणीं मातबर त्या जिल्ह्यांत आहेत. ज्या ठाण्यांत सरदार राहील तेंच ठाणें मातबर. सरदारास आज्ञा व्हावी जे नवाबाकडील दिलावरखां शि-यांत आहेत त्याची कुमक मदत करीत नाहीं तें न करता* आह्मास लोकांचें भय दाखवून आपण शिरें घेऊं ह्मणतात. तेव्हां करारमदार नवाबाचा श्रीमंताचा लोकांस कसा खरा भासेल व करारमदार कोठें राहिला ? त्या प्रांतांत आमची तेवढीच जागा नांवास मात्र राहिली आहे ते घेतल्यास लाचार ! पंधरा लाखांची जागीर घ्यावयाचा करार. पैकीं बारा परशरामपंती करार करून यादी पाठविली. बाकीचे ऐवजांत शिरें घ्यावें ह्मणोन लिहिलें. त्यास पंधरा लाखाची परशरामपंत मागत होते. शेवटीं बारा लाखांची१४२ द्यावी हा निश्चय जाला. तीन हजार फौजेनिशी चाकरी करावी. जोंवर जागीरीचा ऐवज आबाद होऊन खातरख्वा हातास ये तोंपर्यंत जसा वसूल तशी दिडाहजारांनसीच चाकरी करावी. जेव्हां नीट आबादी होऊन वसूल चांगला येऊं लागेल. तेव्हां कराराप्रें॥ ती हजारांनसी करावी. अथवा एखादें काम जरूरी पडेल तेव्हां तिन हजारांनसीच करावी ऐसा निश्चय ठहरून चुकला. महाल मोकरर जाले. त्याप्रें॥ आह्मी आपल्या करारावर कायम आहों. आतां घडी घडी असें कराल तरी कसें होईल? गुंजोटी वगैरे परगणे येथील जप्तीच्या मात्र सनदा रा॥ धोंडो आकदेव यांचे नावे दिल्ह्यात तेथें अमल त्यांचा जाला. वरकड परगणे रदबदलीत टाकिलेत. अशास परशुरामपंतांनी केलें तें श्रीमंती मान्य करून दसरा होतांच हजार दीड हजार फौज चाकरीस पाठवावी. ह्मणजे सनदा करून देऊं त्याजवरून अंमल करावा. वराडचे माहाल जबून? ह्मणतात त्याच माहालावर लक्ष्मणराव खंडागळे आडचा तीहजारा फौजेनसी हमेशा चाकरी करीत होते व रघोजी भोसल्यास बार येत होते. रघोजी बोवाचे प्रस्थ भारी जाल्यावर माहाल त्यांनीं खराब केले. श्रीमंताचे महाल जाल्यावर रा॥ जानोजी भोसल्याची ताकद नाहीं जे तिकडे पाहे. मग कोण्हाचेंहि भय तिकडे नाहींच. तालुका एका दो वर्षांत आबाद होऊन पैसे चित्तानरूप येतील. सांप्रतचा वसूल येथें कसा कळतो ? केवळ वैराण नाहींत. जून आबादी आहे. तनखा वसूल