[२१] पै ।। छ १० र।।वल एकादशी ।। श्री ।। ५ जानेवारी १७५४
पु ।। श्रीमंत राजश्री पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-
कृतानेक विज्ञापना. छ३ रबिलोवली तृतीयप्रहरानंतरे त्रिचनापल्लीहून चार जोडिया हरकारे आले. फरासिसांचा मोर्चा त्रिचनापल्लीस होता. फरासिसांहीं त्रिचनापल्ली फते केली. कोटांत लोक शिरले; ठाणें काई केलें; ह्मणोन वर्तमान आलें. त्याजवरून मुसाबुसी यांहीं बहुत खुशहाली केली. पन्नास पाऊणशें तोफांचें आवाज केले. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. प्रस्तुत मुसाबुसी काहीं नौनिगादास्त ठेवीत आहेत. हजारेक गाडदी नवे ठेवितात ह्मणोन वर्तान आहे. ख्वाजे कलंदरखानास पेशजी नवाबाचे अमलांत मचलीबंदरचा मामला सांगितला होता. त्यांजकडे नव दाहा लक्ष रुपयांची तकरीर निघाली. वाजपुस व्हावी तो खानम॥रनिले पळोन फुलचरीवालेयाचे आसरयास गेले. पुढे नवाब वारला. नासरजंग ठिकाणीं लागेल. प्रस्तुत खानम॥रनिले मुसाबुसीसमागमें हैदराबादेस आले. दोनेक महिने जालियावर मृत्यु पावले. त्यांचे पुत्र अबदुलरहिमानखान७७ मुसाबुसी यांजवळ कुल यख्तीयारी. त्यांस सीहजारी मनसब व नोबत निशाण व कलंरदखान किताब दिधला. तें वर्तमान हुजूर विनंतिपत्रीं लेहून पाठविलें आहे. ख्वाजे अबदुलरहिमान यांहीं बापाचें मामलेयाची फारीखती सलाबतजंगाजवळोन घेतली. छ१ रबिलोवलीं नथमलांनीं आणून दिली. सेवक समीप होतों. सेवेसी विदित जालें पाहिजे. राजश्री परशरामपंत अबदुलहादीखानाचे कामकाजांत बहुत बाजीद होते. शेवट त्यांचे चालिलें नाहीं. तो मामला न्यामदुलखानास जाला. विदित जालें पाहिजे. मुसाबुसी व न्यामदुलाखान सरकारांत लग्नकार्याचे आहेरांचीं वस्त्रें पाठवीत आहेत. येकाद रोजां रवानगी होईल. साल गु॥ भालकीचे मुकामावर मोगलानें सला केला त्या दिवसांत सैदलस्करखानांनीं आपणाकडील भीलालखान दिल्लीस पाठविला होता. हालीं त्यांस फरोजजंगाचे लेकानें कैद केलें ह्मणून वर्तान आलें तें सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. सैदलष्करखान अद्याप वसवासांतच आहेत. मुबारजखान व महमदअनवरखान व हैदरयारखान वगैरे तमाम ख्याजे अबदुलरहमानखानाकडे येत जात असतात. प्रस्तुत येथें प्राबल्य मुसाबुसी यांचे आहे. नवाब सलाबतजंगास कोणी पुसत नाहीं. तूर्त नवाबास बरें वाटत नाहीं. छ१९ र॥वल व छ २५ र॥वल दोन तेरिखा डेरे बाहेर करावयास करार केल्या आहेत. निघतील तेव्हां खरें. आढळलें वर्तमान सेवेसी विनंति लिहिली आहे. सेवेसी श्रृत जालें पाहिजे हे विज्ञापना.