याजकरितां मात्र हलके दम धरीत, ठाणी घेत, पुढे जात जात, सलाबत वाढवून जावें ह्मणोन चंदराजपट्टणास आलों. येतांच ठाणें घेतले. बंदोबस्तीस्तव आज येथें मुक्काम केला. उदैक कुच करून पुढें जातो. पट्टणचे वकील येतात न येतात हेंहि कळेल. डोळे उघडोन ताळ्यावर आले असले तर उत्तम ! जुंजावयाचाच दम असला तर चिंता काय आहे ? $खामाखा तेथेंच जाऊन फौजेचें स्वरूप दाखवूं. स्वामींनीं लि॥ कीं हैदरनाईक वगैरे जमाव जमा होऊन नदीअलीकड राहिले असले तर खामाखा मोडून आंत घालावा. त्यांत साध्यासाध्य पाहून करावें. अलीकडे नसले तर जाऊन थडकावयाचे प्रयोजन नाही. यंदा मोर्चे लावावयाचीहि केवळ मसलत नाही. हे गोष्ट गुप्तच राखोन छावणीचा बेत सर्वत्र प्रगट करावा. गढया घेऊन जपून असावे ह्यणजे सहजच .. .त्र यास यावें तो गढया. ...स राहाल ह्मणजे सहजच टाकतील ह्मणोन आज्ञा केली. ऐशास हैदरअल्लीखान अद्याप आला नाही व आणखीहि कोणी कोठून आला नाही. पट्टणांतहि थोडीशी फौज व गाडदी वगैरे जें आहे तेवढें मात्र आहे. ते कोणी शहराबाहेर निघावयाचे नाहीत. हैदरअल्लीखान वगैरे येणार ते आल्यावर पुढें बाहेर राहावयाचा विचार करणे तर करितील. बते-या बांधितात. तेथें चौक्या ठेवणें तर ठेवितील. ते शहरआस-यानेंच राहतील. नदीअलीकडे राहावयाची जुर्रत१३२ काय ? आणि त्याच्या येण्याच्याहि बातमीत आहों. वरचेवर वर्तमान कळेल तसे करूं. छावणीचाच म॥र प्रगट करावा ह्मणोन आज्ञा केली. ऐशास छावणी विषयी पहिलीं पत्रें आलीं तेव्हा पासोनच पट्टणचे मसलतीस दबाव समजोन छावणी प्रगट केलीच आहे. स्वामीच्या पुण्यप्रभावेकरून लौकरच ताळ्यावर येऊन वकील पाठवितील. ठाणींठुणीं एक पट्टणावांचून कोणी टिकत नाहीं. ठाणीं घेतलीं मुलूक खराब झाला पुढें फारच होईल हें समजोन व पट्टणास येणार हे सलाबत जबरदस्त आहे. ह्यानें भीत होऊन संस्थानचें अपेश नंदरान घेणार नाहीं. १३३..........