[६१] ॥ श्री ॥ १४ मार्च १७५७
राजश्री बाळाजी गोविंद, कमाविसदार, महालानिहाय, प्रांत अंतरवेदी गोसावी यांसी:
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ जनकोजी शिंदे दंडवत सु॥ सबा खमसैन मय्या व अल्लफ. राजश्री शिवराम देवाजी वकील दिमत नवाब अहमदखान पठाण यास पूर्वी अंतरवेद येथील ऐवजीं सन इसनेंत समाईक ऐवजीं रुपये ३०० तीनशेंची असामी दिल्ही होती. त्यास हल्ली वाटणी जहाली१३१. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीकडे रुपये ( १००) शंभर व राजश्री मल्हारजी होळकर याजकडून रुपये (१००) शंभर, एकूण दोनशें. बाकी आह्मांकडील रुपये (१००) शंभर रुपये करार करून दिल्हे असेत. तर मशारनिल्हेस आमच्या महालच्या ऐवजी शंभर रुपये पावते करून कबज घेणें, जाणिजे. छ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें. हे विनंति.
पे।। छ १० साबान.