[२९८]                             ॥ श्री ॥     १ नोव्हेंबर १७६१.

नकल
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्यराजश्री नारो आपाजी गोसावी यांसि:-

सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु।। इसने सितैन यया व अलफ. जागा जागा किल्यांस फितूर होतात. त्यास, तुह्माकडे पुरंधर, वज्रगड आहेत. तेथील तुह्मी खबरदारी उत्तम प्रकारे करणें. चौकीपाहारे अलग, नौबत दुरुस्त करवणें. पाहारे फेरवणें. किल्यावर बरें बरें माणूस ठेवणें. किल्ले सर्व सामानांनीं पुरे संजुदे करणे. तुह्मी खबरदार सावध आहांच. तथापि चौकशीस आळस न करणें. किल्यांचीहि रणघंरे नीट करून ठेवणें. फितुरी मनुष्य असेल त्याची अगोदर चौकशी करणें. जाणिजे.छ ३ र।। खर. बहुत काय लिहिणें.