Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठी धातुकोश
उट १ [ उत् + वृत् १ लेपने ] सुगंधी पदार्थ अंगाला माखणें. इतर रूप - उटण.
-२ [ उत् + वृत् १ लेपने ] तेलानें घासणें. ( पूर्वी आरसे पितळेचे करीत व प्रतिबिंब नीट दिसण्याकरितां ते तेलानें घाशीत )
उ०- हां हो उटूनियां आरिसा । आंधलेया पुढें दाखऊं वैसा ।।
ना बहिरीसि हृषीकेशा । गाणें केउतें ।। ज्ञा. ११-१५७
( "पितळेचे आरसे न्हाव्यांजवळ पुण्यांत चाळीस वर्षांपूर्वी मीं पाहिले आहेत' असें कै. राजवाड्यांनीं लिहून ठेविलें आहे. )
उटक १ [ उत् + टक् १० बंधने; (उत्+टक्+उट्टक् = उटक ) ] बंधमुक्त होणें, वेगळें होणें.
-२ [ उत् + स्तक् १ प्रतिघाते ] अडथळा येणें. उ०- सर्वारंभा उटकलें । प्रवृत्तिचें तेथ मावलें । जलति कां कर्मफलें । तें तें चि योजी ॥ ज्ञा. १४-३६३.
-३ [ उत् + तग् १ गतौ कर्मणि ( उत् + तग् = उत्तग् = उटक) ] उच्चाटण होणें.
उटण १ [ उत् + वृत् १ लेपने ] उटणें अंगास माखणें.
-२ [ उटण ( ना.) ] ( उट १ पहा )
उटाळ १ [ उत् + तल् १० प्रतिष्ठायाम् ; ( उत्तल = उताल = उटाळ ) ] ताफा लावून उलटणें.
-२ [ उत् + स्थल स्थैर्ये ( ना.); { उत्स्थल = उठ्ठल = उठाळ } ] ताफा लावून उलटून देणें.
-३ [ उत् + टल् १ वैक्लव्ये; { उत् + टल = उट्टल = उटाळ } ] स्पष्ट करणें.
-४ [ उत् + ट्वल् १ वैक्लव्ये; ( उत् + ट्वल् = उट्वल् = उटाळ ) ] स्पष्ट करणें.
उठ १ [ अव + स्था १ आत्मने, ( अव = उ; स्था = ठ) ]
उ०- अनीत्वा पंकतां धूलिं उदकं नावतिष्ठते = धुळीचा चिखल केल्याशिवाय उदक उठत नाहीं. शत्रूला मारल्याशिवाय कृष्ण उठत नाहीं.
-२ [ अवशिष्ट ( ना. ) बाकी रहाणें, अवशेष राहणें, बाकी उठणें. णिच् = ओढणें. बाकी ओढणें. इतर रूप - ओढ २४.
-३ [उठ् १ उपघाते ] इ०- डोकें उठलें. तो त्याच्यावर उठला.
-४ [ वठ् १ ग्रंथे ] रचणें. उ०- इमला उठविला = रचिला. इतर रूपें - उठव ४, उठवि.
-५ [ उठ् १ उपघाते ] नाश होणें. उ०- गांव उठलें.
-६ [ उपस्थित = उवठ्ठिअ = उठ + ल = उठल ( ला - ली - लें ) ] उत्पन्न होणें.
उ०- रोगः उपस्थितः = रोग उठला.
भयं उपस्थितं = भय उठलें.
श्वापदं उपस्थितं = सावज उठलें.
-७ [ युट्ट् १० अल्पीभावे, ( युट्ट् = उट्ट् = उठ ) ] उ०- गांव उठणें म्हणजे कमी होणें.
-८ [ उत् + तम् १ पीडायाम् ; { उत्तम् = उठँव } ] उ०- गुरूं अगदीं उठवलें - उठवणीस आलें. ( उठव ६ पहा)
-९ [ उठ् १ प्रतिघाते ] खालीं पाडणें. ( उठव ३ पहा )