मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

प्रभावलीत हवालदारा जवल राहिले त्याचे पुत्र तीन गणोवा व विसोवा व नारोवा नारोवास पुत्रसतान नाही त्याणे रामभट सरवटे खारेपाटणकर त्याचा पुत्र विस्णु दतक घेतला तो गिर्ये गावी केशव नायकी आर्जविले सेत व आगर ते खाऊन तेथे राहिला त्याणे गिर्ये गावीचे ज्योतीस व धर्माधिकारण साधून तेथे च राहिला विसोवाने देशमुखीची मुद्रा दुसरी करावी निमे कारभार आपण करावा ह्मणौन गणोवा नायका पासी वेव्हार आरभिला तेधवा समस्त दायदानी व त्याचे पिते केशव नायकी विसोवास सागितले जे जो वडील त्यास च सिके इतरानी वडीलाचे आज्ञेत वर्तावे वडीलानी सर्वाचे चालवावे आमच्या वशात आजि पावे तो ऐसे चालिले यास अन्यथा वर्तेल जो त्याचे बरे होणार नाही मग विसोवा समजला गणोवा नायकी विसोवास अर्धे बुर्बाड दिले गणोवा नायकी देशमुखी चालविली त्यास पुत्र च्यार माहादोवा एक १ नरसोवा एक १ दामोवा एक १ विठोवा एक १ एकून च्यार ४ माहादोवा सरदेशमुखी करीत असता खिलण्यास किलेदाराने हुजरून नवद गाव तनखा मामल्याहून निराला केला तो कारभार निराला जाहालिया वर किलास नरसोवा राहिला त्याचा वश देवलेकर देसाई विठोवास पुत्र दोन हरी एक १ व पुर्षोत्तम एक १ एकून दोन पुर्षोतमाने विज्यापुरास जाऊन साडे च्यार हजार लाहारी खर्च करून सेतवाडे माहालची सरदेशमुखीचे फर्मान आणिले खर्च लागला तो माहादोवाने रीण घेऊन दिला मग माहादोवा जवल सरदेशमुखीचा वत पुर्षोत्तम मागो लागला वत द्या किंवा कर्ज वारा मग माहादोवाने सारे कर्ज आपण च वारिले आणि सरदेशमुखीच्या वतासी पुर्षोत्तमास पुत्रपौत्रादिकी सबध नाहीसा केला पुर्षोतमाचा वश सैतवडेकर दामोदर आपुत्रीक माहादोवास पुत्र तीन गोविंद एक १ अतोवा एक १ सिवाजी एक १ गोविंद देशमुखी करीत असता प्रभावली प्रात इजारा केला तव पर्ज्यन्य गेला वलटा पडिला टोलानी आगरे भक्षिली लोक देशातरास गेले गोविद नायकास महसुला बदल खेलण्यावर नेऊन घातले दुसरे वर्षी पर्जन्य