Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४] [१५९७ श्रावण वद्य ६
श्री तालीक
सिवाजी राजे अनाजी पडीत सुरनीसी
सिका
कौलनामा अज दिवाण ठाणे तपे सगमेस्वर मामले प्रभावली ताl वेदमुहूर्ती नीलकठभट बिll सोमनाथभट कात्रे वस्ती कसबा तपे मजकूर सुहूर सन सीत सबैन अलफ दादे कौलनामा ऐसा जे तुह्मी येऊन मालूम केले की आपला कसबा घरठाव पुरातन आहे त्यास रामभट सफरे बिढरी ठेविले होते ते हाली कथला करिताती याचा निवाडा केला पाहिजे घरठाव याची हकीकत तरी आपले पिते सोमनाथभट हे पूरवी गोमातकात वैद्यपणाचा वेवसाव करीत असता राजश्री सोमनाईक बिन विठल नाईक सरदेसाई मामले प्रभावली हे दिवाणकार्या निमित्य फोडियास गेले तेथे त्याचे शरीरी आसवस्त जाहाले त्यास वैद्य पाहिजे ऐसा जाहाला त्या वरून सोमनाथभट यास यत्न करून फोडियास गोमातकाहून आणिले उशदउपच्यार करिता वैद्यपणाची साक्षता कलो आली त्यावरून तेहि सोमनाथभटास आग्रह केला की तुह्मी गोमातकी राहोन आधीक काय केले ठावे आहे सगमेस्वरास तुह्मी येणे जे काय येथे उत्पन असेल ते देऊन ऐसे कितेक प्रकारे बोलोन परिवारा निसी आपणा समागमे आणून सगमेस्वरी ठेविलें काही दिवस हरिभट पित्रे याच्या घरी बिढरे होते त्या वरी काही दिवस देशमुखाच्या वाड्यात होते त्या वरी सोमनाथभटी देशमुखआ पासी विनति केली आपल्यास श्नानसध्या कारणे सचतर जागा दिला पाहिजे त्या वरी बरा जागा पाहाता एक सोनार आपले घर जागा विकत होता तो त्याच्या राजीनामा१++++++ राजीपणाचा घेतला की लक्षुमबाई सागेल त्यास उभयता मान्य त्या वरून तीस लिहून पत्र आणविता तिच साक्षपत्र दिले की सोमनाइकी सोमनाथभटास स्थल दिले हे खरे हे साक्ष हरीभट वझे वस्ती कसबा यास हि ठावकी आहे ह्मणौन पत्र लिहिले त्यावरून हरीभट वझे आणून सागितले की तुह्मी सकल भले वित्पन्न बैसोन निवाडा करून देणे यास आनीथा करील तो गोब्राह्मणद्रोही त्यावरी ब्राह्मण बैसोन केला बिll हरीभट वझे नारो पाध्ये धर्माधिकरणी गोविंद जोसी हरिभट पित्रे वासदेवभट देव हे सर्व ब्राह्मणाही निवाडा केला की सोमनाइकी व सोमनाथभटी घरठा रामेश्वरभट सफरे यास दिलाहा नाही भोगवट्यानिमित्य रामभटे घर बाधिले आहे ते रामभटाचे रामभटास द्यावे भूम सोमनाइकी सोमनाथभट यास दिली ही खरे ह्मणौन त्यासी द्यावी ऐसा निवाडा वेदमूर्ती नीलकठभट व रामेश्वरभट सफरे या उभयताचा जाहाला या वरी तुमास कौल सादर केला आहे भूम ठाव देखील झाडे परसू व तुह्मी आपली कमावीस करणे जुने काजाणु आहे ते रामभटाचे रामभटास देणे तुह्मी नवे बाधोन सुखरूप आसणे पुत्रपौ तुह्मास जागा मुकरर आहे सुखे आसणे दरीबाब कौल आसे छ १९ माहे जावल मार्तब सूद मार्तब आसे