मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

व रामराव कानडा यास यवनाही मारिले बेदराची पादशाही वरघाटे व तलकोकणात जाहाली बेदराहून काला खोजा व गोरा खोजा ऐसे दोघे जण आले याणी सर्व देशाची लावणी सचणी केली माहाल कसबे केले प्रभावली मामला करून अठरा माहाल मामल्यास दिले कृष्णाजी परभोलकर यास बारा गाव दुसरे कोकणात दिले रगोवाचा पुत्र सोमाजी नायक याणी पराक्रम फार केला चालके मवासपणे वर्तो लागले कुमारजी च्यालक्याचा पुत्र धारोजी त्याणे उष्णतीर्था जवल श्री केदाराचे देवालय बाधिले असुर्डे गाव केदारास इनाम दिला सोमाजी नायकाचा पुत्र राघोवा त्याचा पुत्र नरसोवा नायक बेदरी पादशाहास भेटोन सरदेशमुखीचा जीर्णोधार केला पत्रे हि घेतली व तेथील सेना व परभोलकर साह्य करून चालकेयासी युध केले धारोजी खोत चालके सगमेश्वरी युधी पडीले नरसोवा नायकी पहिल्याप्रमाणे सगमेश्वर वसविले नदिचे उतरभागी पेठ केली होती त संगमेश्वरा खाले घेतली मग काही काल बेदर लोपले विज्यापुरी पादशाही जाहाली नरसोवा नायकाचा पुत्र केशव नायक विज्यापुरी पादशाहास भेटोन बहुमान पावोन सरदेशमुखीचा जीर्णोधार व फरमान घेतले बुबार्ड गाव इनाम घेतला पादशाहा पासून प्रभावलीस हवालदार आणिला मग त्याचे व परभोलकराचे महद्वैर जाहाले कानोजी परभोलकर मवास जाहाला त्या वरी विज्यापुरीची फौज येऊन मोठे युध प्रभावलीत जाहाले सारे परभोलकर युधी पडिले कानोजीचा पुत्र चादजी त्याचे पुरोहित घेऊन गोवेलेयास पलऊन नेला चादजी देवगिरीस जाऊन पातशाहास भेटोन गोवेले तपा मोकासा घेतला मग तो सवा शत शिपाई सजून राजापूर पावे तो देशोपद्रव करी मग केशव नायक पातशाहा पासी विज्यापुरी मध्यस्त होऊन चादजीस कौल घेतला चादजीन सात शत माणसा निसी पातशाहा पासी चाकरी मान्य केली मग त्यास सगमेश्वरतर्फेस ०००० चास गाव मोकासा दिले श्रीगारपूर राहावयासी दिले केशव नायकी कोड असर्डे व गिर्ये गावी आगर सेत इनाम घेतले केशव नायक