Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३] [१५८४ वैशाख शुद्ध १४
श्री
मसुरुलहजरत राजश्री पिलाजी नीलकठराव सुभेदार नामजाद मामले प्रभावली यासी सिवाजी राजे दंडवत सुहुरसन इसने सितैन अलफ सालगुदस्ता तलकोकण मुलकाची कबजादत बदल खासास्वारी तलकोकणात होउनु मुलूक कबज जाहाला ते वक्ती श्रृगारपूरकर सुर्वे व कोकणातील पातशाई अमलदार याणी बेमानी केली ते नतीजा पोहचोन उधलोन गेले मुलकातील रयतीस सरजामा बदल वतनदार व रयत यास सरकारातून कौल सादर जाहाले वर केसो नायक बिन राधो नाईक मावलगकर व सारे वतनदार मामले मजकूर सरकारी खिजमतीस हाजीर जाहाले सालमजकुरी रगो नाईक बिन केसो नाईक मावलगकर सरदेसाई मामले माl याणी किले राजगडच्या मुकामी हुजूर येऊन अर्ज केला जे आपले सरदेशमुखीचे वतन मामले माl व मामले दाभोल पिडी दर पिडी मातकदम इस्तकबिल पासून ताl सालगुदस्ता पावे तो चालत आले हाली तलकोक(ण) साहेबास अर्जानी जाले वर साहेबी सेवका वर मेहेरबान होऊन कौल सादर केले या वर आ++ वतनाचे बाबे खिजमतीस हाजीर जाहालो हाली दिवाणातून सारी वतने दिवाणातून अमानत जाली आपले कबिजा हक व लवाजिमा व इनामती अमानत जाल्या आपण तो साहेबाचे खिजमतीस एकसान असो साहेबी मेहरबान होऊन सेवकाची वतनावर स्थापना केलिया व कुटुबास अन देऊन उस्तवारी केलिया उमेद धरून एकसान चाकरी करू व ये बाबे तुह्मी इलतिमास लिहिली बाl इलतिमास खातरेस आणून व रयत मामुरी वर नदर देऊन बेकदीम वतनदार याबदल नायक माl यास दोनी मामले माl सरदेशमुखी वशपरपरेने करार करून नाईक माl यास मामले प्रभावलीचे जमाबदीवर पटी पछोडी हाक लारी २००० दोन हजार रयतनिसबत करार केली असे तरी तुह्मी माl माl जमाबधी वर रयतनिसबत सदर्हू लारी २००० दोन हजारची सीस्त बसऊन दर साल नाईक माl देवीत जाणे दर साल ताजा सनदेचा उजूर न धरणे मामले दाभोलची पटी पछोडी हक याची सीस्त होणे त्यास माl माlचे अमलदार व वतनदार हुजूर आणविले आहेत ते आलेया वर होईल या पत्राची नकल घेऊन असल नाईक माlजवल परतून देणे जाणिजे मोर्तब सूद
तेरीक १२ माहे रमजान सुरु सूद