मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

त्याचा पुत्र सूर्याजी तो हि बलिष्ट जाहाला मग रगोवा नायक याचा पुत्र गणोवा नायक त्याणे विद्यानगरीहून साह्य आणून स्वयें युध करून सूर्याजीस मारिले तेधवा गणोवा नायकास धामापूर इनाम दिले गणोवा नायक याचा पुत्र गोपाल त्याचा पुत्र विसाजी तो देशमुखी करी तेव्हा हणमतराउ चादा मराठा मवास होऊन डिगणीच्या रानात राहोन देश मारी तेव्हा विसाजीने परभोलकर हिरोजी प्रतिष्ठित होता त्यासी घरोबा करून विद्यानगरीचे साह्य आणून चाद्यास मारिले तेव्हा कुभारखणी खुर्द इनाम घेतली विसाजीस पुत्र नृसिह नायक देशमुखी करीत असता विद्यानगरीहून आणापा खारेपाटणास देशाधिपति करून आला त्याचे व परभोलकराचे महद्वैर जाहाले परभोलकर विठोजी देश मारी मग नृसिह नायक याचा पुत्र गणोवा नायक विद्यानगरास जाऊन राजदर्शन घेऊन परभोलकरास सवा शत गाव वरघाटे व कोकणात देऊन नेमावर ठेविले काही काल गेलेया वरी धाकोजी चालका मराठा माहासूर तीन शत लोकाचा सरदार त्याणे सेवाधर्मे राजकृपा सपादून गडनदीपासून बाबननदीपर्यत नवद गाव मोकासा घेतले सगमेश्वरी दुर्गाश्रयें राहिला नृसिह नायकाचा व चालक्याचा माहा विरोध जाहला मग नृसिह नायकी सगमेश्वरसोडून नदीचे उतरभागी दो नदीमध्ये दुर्ग बाधोन दुग्धगणपतीपासून नूतन पेठ केली हाट बाजार केले जाखमातेचे पूर्वभागी दुसरी पेठ वसविली मग नृसिह नायक यास पुत्र गणोवा नायक धाकोजीचा पुत्र रामाजी याचे माहा वइर जाहाले चालके च्यार पिढ्या होते गणोवाचा पुत्र रगोवा तो पराक्रमी होता रामाजीचा पुत्र कुमारजी त्याचे व रगोवाचे वइर होते च मग रगोवाचा मुतालीक यादव नायक त्याणे मध्यस्त होऊन रगोवाचे व कुमारजीचे सख्य केले रगोवा नायक विद्यानगरास जाऊन बहुत राजमान्य पावला साहा गाव मोकासा घेतले वेकापा अधिकारी खारेपाटणास आणिला रगोवा नायकाचे पुत्र च्यार जेष्ट सोमाजी त्याणे विद्यानगरास जाऊन सात शत गावची सरदेशमुखीची पत्रे घेतली