Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

कार्यपुरुष धर्मात्मे होते त्याणी आपल्या नावे देवस्थापना केल्या त्याच्या वशपरपरेने राजे राज्य करीत असता पनालयच्या राज्याचे सेनाचक्र येऊन कर्णवशज्याचे राज्य घेतले गाव उछिन च बहुत दिवस होता मग यवनानी वस्ती बहुत दिवस केली कालेकरून ते हि उछिन जाहाले काही यवन नदीवर राहिले होते नरसीभटी येऊन राजाज्ञेप्रमाणे गावी सता केली वीसटके वार्षिक कर घेत नृसिहभटास पुत्र कृष्णाजी बहुत पराक्रमी जाहाला त्ये काली सिगणापुरीच्या राज्याचा वलीबेग- नामक सहस्र अश्वाचा सरदार होता त्यास राज्याने गडनदीपासून बावन नदीपावेतो सतर गाव मोकासा दिले यवन सता जाहाली मग नरसीभट पुत्र कृष्णाजीने बलीबेगाची सेवा करून सतर गावचा इजारा केला आपली च सत्ता केली सगमेश्वराची रचना करून गावात ब्राह्मणादि सर्व जाती आणिल्या हाट बाजार रचून पान मान मर्यादा केली मावलगेयात श्रीवर देवालय बाधिले राजपुरुष वश्य करून सतर गावची देशमुखी व सरदेशमुखी वतन साधिले मावलगे गाव इनाम घेऊन मावलगकर उपनामक व कृष्णाजी नायक हे नाम प्रसिद्ध केले कृष्णाजीस पुत्र दोघे गोविंद एक व विठल एक विठलास पुत्र नाही गोविंद नायकास पुत्र नृसिह नायक नृसिह नायकास पुत्र तीन १ केशव १ वामन १ कृष्ण वामन राजसेवक जाहाला कृष्णाजी मावलगेयात राहिला केशव नायक देशमुखी करीत असता विद्यानगरीचा राजा बुकण याची चढाई कोलापुरीचे राज्यावर होऊन राज्य घेतले सिगणापूर उछिन जाहाले नर्मदेपर्यंत सर्व देश विद्यानगरकराही आक्रात केला मग केशव नायकी विद्यानगरास जाऊन राजदर्शन घेतले तलकोकणात सात शत गावीची राजसत्ता केली तीमापा ब्राह्मण खारेपाटणास आणिल खारेपाटणी कारभार होय या देशाचे पाटण देश नाव जाहाले केशव नायकाचा पुत्र रगोवा तो देशमुखी करीत असता धर्मोजी चवाण मवास त्याणे धामापुरी दुर्ग बाधोन देशास उपद्रव करी राजसत्ता चालो ने दी