यास घेऊन होनाजी सेडकर गेला. मग जतन कैसा होईल ऐसा विचार पडिला. हे नायकाचे मूल, त्यामधे दावेदार जपणीस लागले आहेत, हे काही आपणास जतन होत नाही. जे नाईक याचे बरोबरीचे असतील तेथे जतन होईल. तरी यासी पासलकर याजपासी नेऊन त्याचे हवाला करावे. ते जोरावर आहेत ते जतन करितील. ह्मणून बावाजी राऊ यास घेऊन निवगणी याकडे मौजे आंबी ता। मोसेखोरे येथें गेला. तेथूनही तोवेस पासलकराकडे घेऊन गेले. तेथें त्याच्या हवाला बाबाजीराऊ केले. ते जाणते जालियावरी होनाजी सेडकर यासी बोलाऊन नेले; आणि त्यास विचारलें की आमची गत ऐसी जाली, पुढें कैसें करावें, ऐसे त्यास पुसिलें. त्याणी सांगितले कीं तुमचे सिपाई व आणखी उदंड मांग राहिले आहेत. परंतु तुमचें साहित्य पासलकर देशमुख ता। मोसेखोरे याची पाठी आहे. हेहि तुमची मदत करितील. आणि बाजी नाईक मरळ व सूर्याजी नाईक मरळ व मालोजी नाईक मरळ हे तिघे हाताखाले गवसून कार्य करावे. त्यांच्या हातून कार्यसिध्दि होईल. आपणहि साहित्य करून. परंतु त्या तिघास हातीं धरिलें पाहिजे ह्मणोन. ऐसे होनाजीं सेडकर याणे बाबाजीराव यास सांगितले. त्या तिघांचा तलास होनाजी सेडकर याच्या हातून केला, आणि त्यास घेऊन होनाजी सेडकर बाबाजीरायापासीं गेले. त्याचें व बाबाजीराव याचें इनाम जाले जे, आपण देशमुखीं करूं लागलियावरी तुह्मां तिघास तीन गाव देईन. ऐसी बाली जाली. त्यावरी सेडकर याजपासी घोडी होती त्याचे राऊत व बाजीनाईक मरळ व सूर्याजी नाईक मरळ व मालोजी नाईक मरळ ऐसे त्याखेरीज जमाव करून कानदकरावरी आले. त्यासी त्याचे पारपत्य जे प्रकारें कानदकर मरळ याणी काम केले होते, ते रीतीने त्याचेहि काम केले. जे सापडले त्यास मारिले. ऐसे काम त्या तिघांच्या हातून केले. बाबाजी जुंझारराऊ आपल्या वतनावरी येऊन देशमुखी करावयास लागले. मग मालोजी मरळ यासी वेले बु॥ येथील पाटीलकी दिल्ही व मोजे राजणे नीम सूर्याजी मरळ यास दिल्हे होते. बाजी नाईक मरळ यासी मौजे दापोडे येथील देशमुखीचा हक निमे दिल्हा होता. सेडकर कामास आले. त्यास मौजे दापोडे येथील पाटिलकी दिल्ही. पहिले कारले पाटील होते. त्याची पाटीलकी सेडेकरास दिल्ही. पुढे बाबाजीराऊ होते तोवरी जे या तिघास दिल्हे होते, ते तिघेहि खाऊन होते. त्यास बाबाजीराऊ हे मेलियावरी कानोजी जुंझारराऊ देशमुखी करू लागले. तेसमई बाजी नाईक व सूर्याजी नाईक मरह ऐसे दोघे रुसवा करून, किले पुरंधरास राजश्री नरसिंगराऊ होते त्याजकडे गेले. त्याणी राजश्री भानजीपंत पाठविले की, बाजी नाईक व सूर्याजी नाईक मरळ आह्माकडे तुह्मावरी रुसवा करून आले आहेत. त्यासी बाजी मरळ मौजे दापोडे तो गाव देसमुखीचा आवघाच मागतो. तोच गांव जरी बाजी नाईक यास मौजे दापोडे येथील देशमुखी आवघी द्याल तरी याची समजावीस करून. ऐसी बोली भानजीपंत याणी कानोजी जुंझारराऊ यासी केली. यावरून कानोजी जुंझारराऊ मरळ याणी भानजीपंत याच्या बराबरी पाटील वतनदार पुरंधरास पाठविले होते बि॥ न॥