Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मालोजी चरघा मोकदम मौजे कोलवडी १
 लिखजी लिह्मण मोकदम मौजे विंझर १
पाकोजी सेडकर मोकदम मौजे दापोडे १
लखजी सेडकर मोकदम मौजे  मालवली
परसोजी देवगीकर चौगुला मौजे विंझर १
जमानी बीन सेख भाई तुरसदास  मुसलमान १

एकूण साहाजणें त्याच्या सांगातें दिल्ही. त्यासी भानजीपंत घेऊन किले पुरंधरास गेले. ते व अवघे हजीरमजालसीस बसले होते. त्या हुजूर बाजी मरळ यासी समजावीस करून त्यास दापोडे येथील देशमुखीचा महजर करून दिल्हा. सु॥ सबा अशर अलफ बतारीख ११ जिल्हेज मुकाम किले पुरंधर हजीरमजालसी बि॥ नांवनिसी :-

राजश्री माहादजी जाधवराव नाम-
जाद किले मजकूर
राजश्री हाणवंतराऊ हरकारी किले
 मजकूर
भानजी बनखस मुतालिक राजश्री नरसिंगराव
तमाजी अनंत मु॥ लबे बहीर देव
आपाजी फरजंद बि॥ मल्हारजी
देशमुख प्र ॥ सिरवल १
तुलाजी व जाखोजी देशमुख त॥
खेडेबारे
यसवंतराऊ अटगावकर खोत
ता। सिवतरखोरे
बाजी हैबतराऊ देशमुख त॥ गुंजण
मावळ प्रा। मुरूमदेव
कानोजी जेधे देशमुख ता। भोर ता। रोहिडा
नरसोजी खोपडे देशमुख ता। अत्रोली ता। रोहिडा
यमाजी मोकदम मोजे पुणे प्र॥ पुणे
आबाजी बांदल मोकदम मौजे
 अलंदे ता। हिरडस मावळ
बाबसेट सेटिया पेठ मुर्तजाबाद
ता। किले मजकूर नि॥ तागडी १
कडदसेट बाधा महाजन पेठ मुर्तजा-
बाद ता। किले मजकूर नि॥ तागडी १

सदरहूप्रमाणें गोत व त॥ मजकूरचे पाटील चौगुले सदरहू सहाजण तेथे गेले होते. त्यांचे साक्षीने बाजीनाईक मरळ यासी दापोडे येथील देशमुखीचा महजर करून दिल्हा आहे. त्याप्रमाणे अजी त॥ खात आले आहेत. व सूर्याजी नाईक मरळ यासी मौजे राजणेस मळा व गाव दिल्हा व मालोजी मरळ यासहि मौजे वेले बु॥ पाटीलकी व देशमुखी देखील गाव त्यास दिल्हा. ऐसी तिघाची समजावीस केली व आणखी बाराजण सिपाई होते त्यास घर सेत मोजे धानेबांत आहे ते दिल्हे. वरकड रजपूत होते त्यांसहि सेत धानेबांत दिल्हे जे कामकाजास आले त्यास देऊन समजावीस केली. जिवाजी नाईक मरळ याचा काही वडील आपले वंसीचे नव्हे. त्याच्या वडिलांनीं कट मेहनत केली. आपल्या वडिलास कार्यास आला. त्याजकरिता त्याजला गाव त्याच्या वडिलांनीं मागितला होता. तोच गाव त्यास दिल्हा. ऐसा जिवाजी मरळ याचा मजकूर आहे. आपले वंसीचा नव्हे हे खरे. आपणावरी वतनामुळे नागवणा पडिला. कानदकर मरळ याणी बलवंतराऊ कोकाटे किले प्रचंडगड होते, त्याजपासी फिर्याद होऊन, त्यासी सांगोन, कानोजी जुंझारराऊ याची स्त्री अबई आवा त्यास गडावरी नेऊन, त्याजपासून खुर्दा टके १२०० बारासे टके घेतले. त्याचे हाल हजारेंत इंचू घालून देशमुखी मुळें विपत्य करून, सदरहू बारासे टके नागवणे घेतली. त्यावरी महाराज राजश्री सिवाजी महाराज छत्रपति स्वामी सिंहासनारूढ जाले. तेसमई तमाम आवघा महालोमहालच्या वतनदारावरी सिंहासनपटी घातली. तेवेळेस आपणावरी होन १००० एक हजार होन पटी घातली. याखेरीज मिरासपट्या त्याहि दिल्हे. त्यावरी कानदकर मरळ, महाराज राजश्री कैलासवासी थोरले महाराजस्वामी यासी उभे राहिले, आणि देशमुखीच्या विभागाचा व खुनाचा आमच्या वडिलासी कजिया सांगो लागले. त्यास महाराज राजश्री छत्रपति स्वामीनी कानदकराची व आपली मनसुबी राजश्री अनाजी पंडित यांजकडे दिल्ही. त्याणी कानदकर याचा व आमचा इनसाफ पाहिला. त्यास कानदकर मरळ याणी आमचे खून केले ते गैर केले ह्मणून त्याजला नशहात करून त्याजला एक गाव देवऊन त्याचा आमचा कजिया तोडिला. तेथे अमच्या वडिलास हरखी पडिली. तोहि टका आमच्या वडिलानीं दिल्हा. त्यावरी हजरत अवरंगशाहा पातशाहा याची चाली दक्षणेंवरी जाली. तेसमई किले सिंहगड व राजगड प्रचंडगड ऐसे मोगलानीं घेतले. आपले आजे कानोजी जुंझारराऊ कबिला घेऊन कोकण प्रां। गेले. तामजकूरचे पाटील व जावजी सेडकर व सोनजी कोढीतकर व आणखी पाटील रयेत देखील वनखल तपियांत हातनली तर्फ प्रा। मौजे निंगडोलीस जाऊन राहिले.