लेखांक ८६.

श्री.

'' ε म॥ अनाम देसमुख त॥ कानदखोरे यांस चिमणाजी नारायण सचिव सु॥ तिसा सलासीन मया अलफ. ता। मजकुरीं मसलत तासगाव लोक २५ पंचवीस नेमिले आहेत. ते आपणास पाठविले नाहीत. हाली देखत आज्ञापत्र पंचवीस माणसें घेऊन, किले सिंहगडचे मुकामीं येणें. विलंब जाहलिया मुलाहिजा होणार नाही. या कामास जानोजी किवला दि॥ लबे बा। स्वारी पा। असेत. यास महसल रु॥ २ दोन देविले असेत. अदा करणें रा। छ २५ रा। लावल.''

बार सुरु सुद.

लेखांक ८७.

श्री.

'' ε म॥ अनाम देसमुख व देशपांडे त॥ कानदखोरे यांसि सदासिव चिमणाजी सचिव सु॥ इसने समानीन मया व अलफ. ता। मजकूर येथें शामलाकडील चोरटे येऊन उपद्रव केला आहे. किल्ल्याखालील पेठेस येऊन दंगा करितात. ह्मणोन हुजूर विदित जालें. त्यावरून हें आज्ञापत्र सादर केलें असे. तरी तर्फ मजकूरचे इसाफतीचे लोक असामी ५० पंनास राजश्री माधवराव भिकाजी यांजकडे देविले असेत. तरी देऊन घाटाचा बंदोबस्त करणे. पोटास सिरस्तेप्रमाणें मा।रनिलेकडून देविलें असे. जाणिजे. छ १८ रमजान प॥ हुजूर.''

समाप्‍त