Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सोळावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८१.
श्री.
'' ε ॥म॥ अनाम नारायणजी जुंझारराव देशमुख व देशपांडे ता। कानदखोरे यांसी नारो शंकर सचिव सु॥ अर्बा सलासैन मया व अलफ. तुमचे पुत्र बावाजी जुंझारराऊ व जिवाजी बिन तुलबाजी मरळ या उभयताना राजापुरीचे मुकामीं विनंती केली की, शामलावरी मोहीम राजश्री स्वामीनीं केली. फौज देऊन राजश्री फत्तेसिंग भोसले व राजश्री बाजीराव पंडित प्रधान ऐसे एकंदर वैशाखमासीं रवाना केले. पदाती जमाव मावळप्रांतीचा स्वार समागमे जाऊन स्वामिकार्य करणे ह्मणून आज्ञा केली. व राजश्री आनंदराऊ बहिरव यासमागमे आपण जमावनिसी मोहिमेस आलो. कष्ट मेहनत जे करावयाचे ते उभयतासमागमे हुकुमाप्रमाणे केली. खोकरी राजापुरी कुल देशदुर्ग रायगडिसहवर्तमान हस्तगत जालिया खुशालीच्या प्रसंगीं मावळप्रांतीच्या जमीदाराचे बरें करावें; इसाफतीच्या गांवास मोगलाई बैसली आहे, ते माफ करून सोडावी; व स्वराज्यपैकी बाबती वसूल घेताती व ऐन दस्त पैकी तिजाई घेतात; त्यास ऐवज दस्त बाबती स्वराज्याची बेरीज एक करून तिजाईमात्र..... बाबती घेऊ नये; ह्मणून विनंती केली. त्याप्रमाणे तह करून सनद सादर केली असे. गावगना बितपसिल.''
येणेप्रमाणें तह केला असे. या तहबरहुकूम तुमचें चालविलें जाईल. कदाचित् माहालसिरिस्तियानें पाहाणी होती ते न जाली, खंडणीच जाली, तरी आकार होईल त्यापैकीं मोगलाई वजा करून, त्याची तिसरी तक्षिम टका आकारेल तो वसुल घेतला जाईल. याखेरीज किरकोळी पटीयाचा तगादा लागणार नाही. जाणिजे. छ १० रबिलावल मोर्तब असे.''