कानोजी जुंझारराऊ याचे पुत्र सदरहू तिघे. त्याची ना। वडिल शंकरराऊ हे, मोगलाई जाली तेव्हां मोगलाचे ठाणे क॥ खेड त॥ खेडबारे येथे मोगल होता, त्याचा कौल त॥ मजकुरास घेतला जे, सारी मोगलाई जाली, कोठे जावयास जागा नाहीं. ह्मणून कौल घेतला होता. याजकरिता मोगलाने देशमुख पाटील ऐसे वोलीस ठेविले होते, तेथे वोलीस होते. तेथेच मेले. व तिसरे यसवंतराऊ आपमृत्य मेले. एकूण दोघांचे संतान नाही. नारायणजी जुंझारराऊ एकलेच राहिले. त्यासी पुत्र ३ हाली आहेत

१ वडिल बावाजी जुंझारराऊ
१ दुसरे यसवंतराऊ
१ तिसरे कानोजीराऊ
-----

दुसरे बाजीराऊ याचे पुत्र सूर्याराऊ. याचे पुत्र दोघे हाली असेत.
१ वडील मल्हारराऊ
१ दुसरे यादवराऊ.
१ तिसरे मोरोजीराऊ.
१ चौथे शाहाजीराऊ.
---

चौ भानजीराऊ. त्यास पुत्र एक वेंकटराऊ. देशावरी आहेत १

एणेंप्रमाणें आपली वंशावल. वरकड मरळ आहेत परंतु आपले वंसीचे नव्हत. कितेक सिपाईपणा करून होते. त्यामधे जिवाजी नाईक मरळ आपले वंसीचा ह्मणून देशमुखीच्या वृत्तीच्या वाटियाचा कजिया सांगतो. त्यास त्याचा वडिल बाजीनाईक मरळ आपल्या वडिलास कार्यास आले. व सूर्याजी नाईक व मालोजी नाईक मरळ ऐसे तिघेहि कामकाजास आले. त्याचा मजकूर :- मुकनाक मरळ आपला तक्षीमदार कानदकर हा, बेदरास तांब्राकडे ता। मजकूरच्या कारीरास परसनाक मरळ देशमुख आमचे वडील सिकियाचे खावंद याणीं पाठविला होता तेथून तो आलियावरि तोच बळावला. परसनाक मरळ आपले वडिल होते. ते मृत्ये पावले. त्यावरि त्याची स्त्री पुतलावा होती. ती गरोधर होती. वडील पुत्र बावाजी जुंझारराऊ वडिल व दुसरा पुत्र त्याजहून लहान होता. ऐसे दोघ पुत्र होते. त्यास कानदकर मरळ याणीं त्या तिघास मारावे. आणि देशमुखी आपणच करावी ह्मणून विचार केला. आणि गोंधळ आपले घरी आहे ऐसे निमित्य करून, त्या तिघास धानेबास येऊन, तिघासहि वाडियांतून काढून, मार्गावरी वाघवळावीर धानेबांत आहे तेथे आणून, तुलबाजीराऊ याहून लाहाण होता तो पुतलाई आवा ऐसी दोघे मारिली. त्या दोघावरी गजर जाली. तेव्हा बावाजीराऊ पळाले. ते श्रीच्या देवळामागे रान उढियाचे होते व गाठीयाचे गवत दाट होते, त्यामधे जाऊन दडाले. पुतलाईआवा व धाकआ पुत्र लहान होता, तो मारिला. बावाजीराऊ याचा तलास त्याणीं केला, परंतु ते सापडले नाहीत. मग कानदकर मरळ इतके काम करून माघारे कानदास परतोन गेले. पुतलाई आवा व मूल कानदकर मरळ याणी मारिली, ऐसी खबर होनाजी सेडकर यास कळली. ते आप्‍तविशई नातलग होता. त्याजकरिता खबरीस तिसरे दिवसी आला. तो पुतलाई आवा व एक मूल मारिला, एक रानात पळोन गेला, ऐसे वर्तमान तहकीक जाले. त्यावरून तो त्या रानांत जाऊन मी होनाजी सेडकर आलो आहे, कोठे असलास तरी मजपासी येणे ह्मणून बोलिला. मग बावाजीराऊ याणी जाब वोळखिला ह्मणून त्यांजपासी आले.