लेखांक २

श्री.

''करीना बा। बावाजी जुंझारराऊ बि॥ नारायणजी जुंझारराऊ मरल देशमुख ता॥ कानदखोरे सु॥ खमसैनमया अलफ कारणे करीना व वंशावली लेहून दिल्ही ऐसीजे :- जिवाजी बि॥ तुलबाजी नाईक मरल ता॥ मजकूर वृत्तीच्या देशमुखीच्या विभागाकरिता आपणासी कजिया सांगतो जे, आपण तुमचा भाऊ, आणि आपणास वाटा विभागाप्रमाणें वाटा दिल्हा नाहीं, ह्मणोन हुजुर फिर्याद जाला आहे. त्यावरून आपणास हुजूर सातारियाच्या मुकामास बोलाऊन आणून आज्ञा केली जे, जिवाजी नाईक ह्मणतो की तुह्मी वृत्तीच्या विभागाचा वाटा यथास्थित विभागाप्रमाणें दिल्हा नाही, ऐसे ह्मणतो. त्यास हा तुमचे वंसीचा नव्हे. याचा करीना व तुमची वंशावली मूळ पुरुष तुमचा कोण, मूळी देशमुखी कोणत्यानें केली, त्यापासून वंशावली लेहून देणे ह्मणून आज्ञा केली. ऐसियास जिवाजी मरळ आपले वंसीचा नव्हे. जातीचा मरल आहे. परंतु आपले वंशावलींत नाही त्याजला मौजे दापोडे देशमुखीचा गाव आपल्या वडिलांनी दिल्हा आहे. त्याचा करीना व आपली वंशावली ऐसी असे. आपला मूळ पूरुष रघनाक मरळ देशमुख त्यास पुत्र ३ नावनिसी बि॥ :-

१ वडिल परसनाक मरळ देशमुख
२ दुसरा कमलनाक मरळ
३ तिसरा तुकनाक मरळ
------

यासी दुसरा कमलनाक मरळ त्यास संतान नाही दोघांचा वंश आहे. बि॥

वडिल परसनाक मरळ देशमुख यांचे पुत्र बाबाजी जुंझारराऊ मरळ एकलाच उरला. याचा मजकूर हकिकतींत येईल. बाबाजीराऊ यास पुत्र कानोजी जुंझारराऊ एक. दुसरा नाहीं.

तुकनाक मरळ तिसरा याचा वंश कानदकर मरळ त्याचा वंश आहे. कानोजी जुंझारराव मरळ वडिल देशमुख त्यासी पुत्र ३ त्यांची संतती :-

वडिल बावाजी जुंझारराऊ त्यासी पुत्र ४ बि॥ नावनिसी
१ वडिल कानोजी जुंझारराऊ.
१ दुसरा बाजीराऊ.
१ तिसरा बहादुरजी राऊ.

दुसरा रायाजी राऊ त्यास पुत्र १ एक अबाजीराऊ. यासी संतान नाही.

तिसरा मलोजी पतंगराऊ ह्मणवीत होते. त्यासी पुत्र १ शाहाजीराऊ देशावरी गेले. त्यास पुत्र किती आहेत कळत नाहीत.

वडिल बावाजी जुंझारराऊ यासी पुत्र ४. त्याचा विस्तार त्याचा झाडा येणेप्रमाणे असे.

वडिल कानोजी जुंझारराव यासी पुत्र ३ तिघे.

१ वडिल शंकरराऊ.
१ दुसरे नारायणजीराउफ्.
१ तिसरे यसवंतराऊ.
-----