जेधे याजकड र्ता। भोर खोपडियाकडे र्ता। उभवली
येथील गाव सुमारे  येथील मुलचे गाव सुमार ४
१ मौजे सिरवली  १ मौजे वडगाव
१ मौजे नाव्ही १ मौजे खानापूर
१ मौजे करणवडे १ मौजे नेरे
१ मौजे चिखलगाव १ मौजे पाले

सदरहू आठ गाव दोनी रोहिडखोरीं त्याची वाटणी येणेप्रो। देशमुखीचे वतनाची जाली. त्याजवर कान्होजी बीन भानजी नाईक जेधे देशमुख याचे च्यार गाव मुलचे होते, त्याचे वीस गाव भोर र्ता।चे केले. ते समई देशमुख व देशपांडे व किल्याचे हकीम व गडकरी लोक व देशक व पाटील परवाडी समस्त मिळोन, मौजे सिरवलीच्या वडाखाली बसोन, च्यार गावचे वीस गाव केले. ते समई वीस गावांपैकी दोन गाव इसापत देशमुख याची व बारा मुलवे याची सेते मौजे कारी व मौजे आंबवड दोन गाव इसापत, त्यापैकी बारा मुलवे यास मौजे कारी दरोबस्त दिल्ही व मौजे आंबवड येथील इसापत देशमुख खुद्द याणी खावी. परंतु काही सेते व घर ठाणे मुलवियास दिल्ही आहेत. व गोडावला यास सेते व घर मौजे नाव्हीस दिल्हे आहे. याप्रो। कान्होजी नाईक यास पुत्र सातजण होते. व कान्होजी नाईक ते तो किले रोहिडा येथून वरात जाली की, तुमचे माहालचे ऐवजी च्यार हजार टके पाठऊन देणे ह्मणोन वरात घेऊन वरातदार आले. ते समई कान्होजी नाईक याणी वरात व वरातदार पाहून राग आला. तेव्हा नाइकानीं वरातदारास व हकीमास आईमाई जेरुवेटी करून वरात माघारी टाकिली. वरातदार निघोन किलियास गेले. किलेयाची श्वारी तयार होऊन आली. ते समई कानोजी नाईक व समस्त लोक मुलामाणसासुधा निघोन कारीस जाऊन राहिले. तेव्हा त्या जामीयास स्वारीचे बल चालेना. ह्मणोन स्वारी फिरोन किलेयास गेली. उपरांतिक आले. चौ रोजानी देशमुखाचे सातजण पुत्र व लोक मिलोन पत बांधोन किलेयास गेले. तेथे जाऊन ह्मणो लागले कीं, आह्मापासून तकसीर जाली. आपण धणी खावंद आहेत; तकसीर माफ केली पाहिजे. तेव्हा हकीम बोलिले की, तुह्मापासून काय तकसीर जाली ? तुह्मी सिव्यागाळी केल्या व नानाप्रकारचे बोलिला की नाही ? कसे जाले ते खरे सांगा. त्याजवर देशमुखाचे पुत्र साहजण याणीं साक्ष दिल्ही की, देशमुखानीं वरातदार यासच सिव्यागाळी दिल्या; परंतु हकीमास काही बोलिले नाहीत. ह्मणोन साक्ष दिल्ही. शेवटी सार पाहून, धाकटा नाईकजी नाईक यास पुसो लागले की, कसे जाले ते खरे सांग. तेव्हा नाईकजी नाईक बोलिले की, सत्य असेल ते मी सांगेन. साख चाकर परंतु आपण धणी हकीम म्हणजे आमचे जमीनदाराचे मायबाप. तेव्हा आईस सिवी दिल्ही. तिचा उचार माझे मुखे मी कसा करू ? सर्वस्वे मायबाप धणी आहेत. सर्व अपराध माफ केले पो।. ते समई हकीम तुष्ट होऊन मेहरबान जाले, आणि बोलिले कीं, सर्व वतनदारी व देशमुखी राखतां हाच राखील. जमीनदारीस योग्य माणून ह्मणोन वडिलापासी सिका होता तो घेऊन धाकटे नाईकजी नाईक याचे स्वाधीन केला. तेव्हांपासोन नाइकजी नाईक देशमुखी करू लागले. पुढे त्याचे वडील बंधू साहजण मिळोन नाइकजीस मारावयास जपो लागले. तेव्हा एके दिवसी साहा जणांनीं मिळोन नाइकजी नाईक यास मारले. तेव्हां बारा मुलवे याणी मिळोन, समत करून, सोनजी व भिवजी नाईक जेधे यास मारावे. का की नाईकजीसारिखा माणून याणी मारला. यास्तव समस्तानी मिळोन सोनजीस व भिवजीस मारावे ऐसा सर्वाचा मनोदय एक होऊन मसलत जाली. आणि रावतास ह्मणो लागले कीं, तुह्मी देशमुखाचे प्रधान, याजकरिता तुह्मी व आह्मी हे कार्य करावे. त्यास राऊत व घोलप ह्मणो लागले की आपण जेधे याजवर हात करणार नाहीं. ते समई सांगवीकर घोलप याचा गोत्रपुरुष जुन्नरदेसीं नांदत होता. त्याणे करार करून समस्त मुलवे मेळवून, सोनजीस व भिवजीस मारले.