मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

ते वख्ती मचचद्रापलीकडे नवाब तरहतखान याचे मारफातीनी भेटी घेतली वसतगडास येऊन दवाजानजीक मूर्चा लावून, गडकरी दबाबून, गडसल्ल्यास आणून दिल्हा तेथून लष्कर साताराखाले गेले तेथे हि मूर्चाखाले साहा माणूस आपले कामास आले ते बख्ती बशर्ते जमीदारी, सीसदी मनसफ, सभेरी स्वार, ऐसी मनसफ राजश्री बापोजीपत याचे मारफतीने दिल्ही, व जमेदारीचा परवाना आरसखान दिवाण याकरवे देविला त्यानी परवाना द्यावा तो ते ठिकाण पोहोचले ते काम तैसे च राहिले व रामराजाच्या लेकानी तजवीज करून धनाजी जाधव यास सागितले की, कर्‍हाडची देसमुखी भोसल्याची ऐसे कळले ह्मणजे पादशाहा खालसा करितील, तरी पदाजी व पिराजी यादव यासि पाठवून कर्‍हाडचे देसमुखीवरी ठेवणे, जे पैसे लागतील ते त्यास पुरवणे ऐसी हुन्नरवदी करून पदाजी व पिराजी यादव हे कर्‍हाडी ठेविले जो टक्का लागतो तो धनाजी पुरवितो याउपरि पिराजीचे दोघे लेक, एक सरूपजी व दुसरा सुभानजी, हे गनिमाकडे पचहजारी करीत यानी आपली घोडी धनाजीपासी ठेवून कर्‍हाडाबादेस आले व पदाजीचे दोघे लेक, डोगरोजी एक व दुसरा अबोजी यादव डोगरोजीने आपली घोडी व आपली पचहजारी ऐसे आपल्या भावाचे हवाला करून, आपण हि एक महिना होईल, कर्‍हाडास आला आहे व पदाजी यादव याचा भाऊ गिरजोजी यादव हा राजारामाच्या लेकापासी दिवाणगिरी करीत आहे ऐसे गनिमाकडे राहोन, मोगलाई लुटोन आणून धनाजी व यादव मजसी दावा करीत आहेत हमेशा चोर घालून, पादशाही लष्करातून घोडी सोडून नेऊन, गिरजोजी यादवापासी पाठविताति हे कोणी पादशाहीमधे मनात आणितील तरी बजिन्नस चोर च धरून हाली धनाजी जाधव यास लावून देऊन माझ्या परगणाचे दोनी च्यारी गाव मारून नेले पादशागडी जतन होवी ह्मणौन चाळीस पन्नास स्वार से सवासे प्यादा हमेशा बाळगीत आहे राणोजी घोरपडा त्यास लावून देऊन मसुरास वेढा घातला तो हि वेढा राणोजी घोरपड्याचा मारून काढून दूर दपद्येफ् केला व राजश्री मबाजी राजे हे ठिकाणी पोहोचले. त्याचे तर्फेचे ठाण्यामधे लोक होते ते कुल निघोन गेले मग आणिखी लोक ठेवून व आपले पदरीचे स्वार व प्यादे होते ते ऐसे मिळोन तीन च्यारी से माणूस, त्याच्या पोटाकारणे च्यारी हजार रुपये सावकाराचे कर्ज काढून अडीच महिने ठाणे जतन केले धनाजी जाधव याचा भाऊ शिवाजी जाधव व लिगोजी माना ऐसे येऊन वेढा घातला तो हि वेढा मारामारी करून उठविला तो सवे च धनाजी जाधव व यादव पदाजी व पिराजी ऐसे ठाणावेरी आले तेव्हा जरून जाहाले लोकास काही द्यावयास नाही मग मिर्जा यारअल्लीखा साहेबास टाकोटाक लिहिले त्यानी खाने अजम यासीनखान यासी हुकूम केला. मग त्याची मदती आली त्यानी व आह्मी धनाजी हि वाटे लाविला ऐसी खस्त पादशाहीमधे केली त्याचे नावरूप जाहाले नाही मजपासी पैके नाहीत पैके असते तरी अवघे च बरे होते गनीम असता कर्‍हाडामधे देसमुखी करीत आहेत त्यापासी पैके आहेत व जे लागेल ते धनाजी जाधव पुरावा करीत आहे ऐसा अधेर कारभार पादशाहीमधे कोणी मनास आणीत नाहीत पैके पावले ह्मणजे एकाचे वतन एकास देतील आता माझी देसमुखी घेऊन धनाजीस देणार आहेत कर्‍हाडचा देसपाडे यास धनाजी जाधवाने पधरा हजार रुपये देऊन मजसी भाडावयास लाविला आहे माझी कोणी दाही देईल तरी इतके खरे करून देईन ऐसी हकीकती आहे विदित जाहाली पाहिजे