Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
संस्कृत भाषेचा उलगडा
३१. आता मध्यम पुरुषवाचकसर्वनाम जे पाणिनीय युष्म द् त्याचे पृथक्करण करू. पाणिनीला असे उत्तम पुरुषवाचक सर्वनामाचे खरे स्वरूप काय आहे ते कळले नाही, तसेच त्याला मध्यम पुरुषवाचकसर्वनामाचेही हृद्गत कळले नाही. वैदिकभाषेत त्व म्हणून एक सर्वनाम आहे. या त्व सर्वनामाचा अर्थ अन्य, भिन्न, निराळा, असा आहे. तसेच संस्कृतात तु म्हणून अव्यय आहे. हे तु अव्यय भेद किंवा पक्षांतर दाखविते. म्हणजे तु अव्ययाचा अर्थ भिन्न असा आहे. त्याप्रमाणेच वैदिकभाषेत त्वै म्हणून अव्यय आहे. हे तु अव्यय विशेष किंवा वितर्क दाखविते. म्हणजे त्वै या सर्वनामाचाही अर्थ भिन्न असा आहे. तद् (त सर्वनाम) तु, त्वै, व त्व हे सर्व शब्द भिन्नतावाचक ऊर्फ भेदवाचक आहेत व हे चारी शब्द एकाच पूर्ववैदिक मूळ शब्दापासून निघालेले आहेत. या चार शब्दांच्या जोडीचा पाचवा पूर्ववैदिक शब्द द्बै हे अव्यय आहे. हे द्वै अव्यय त्वै प्रमाणेच विशेष किंवा वितर्क दाखविते. म्हणजे द्वै चा अर्थ भिन्न, निराळा असा आहे. त्वै आणि द्वै ही एकाच शब्दाची दोन रूपे आहेत. द्वै शब्दाचा जोडीदार जसा त्वै शब्दा तसा त्व सर्वनामाचा जोडीदार द्व हा संख्यावाचक शब्द आहे. द्व चा अर्थ मित्र, निराळा, दुसरा. या द्व संख्यावाचकशब्दाचे द्वि, द्वा हे पर्याय आहेत. तात्पर्य, त्व, द्व, द्वि, द्वा, द्वै, त्वै, त्व व तु हे आठही शब्द एकाच पूर्ववैदिक मूळ शब्दापासून निघालेले आहेत. पैकी तु या शब्दाला उत्तम पुरुष वाचकसर्वनामाची रूपे जोडून मध्यम पुरुषवाचकसर्वनामाची रूपे वैदिकभाषेत बनतात. तु + हम् = तुहम् या सर्वनामाचा अर्थ, तु म्हणजे भिन्न, निराळा, दुसरा व हम म्हणजे मी मिळून दुसरा मी, असा आहे. आर्यांचे रानटी पूर्वज स्वत:ला मी म्हणत व स्वत: सारखी जी दुसरी व्यक्ती तिला दुसरा मी, मीच. पण माझ्याहून भिन्न मी, निराळा मी, असे म्हणत. हा दुसरा मी ऊर्फ तहम् शब्द येणेप्रमाणे चाले. हम् सर्वनामाच्या रूपांना पाठीमागे तु हा शब्द जोडावयाचा, एवढेच येथे कार्य आहे. तु चा सु, सु चा हु, हुचा उ, उ चा यु विकल्पाने होतो.
(१) तु + अहम् = त्वहम् = त्वम्
* प्राकृत तम्,
(२) तु + आवाम् = सु + आवाम् = हु + आवाम् = यु + आवाम् = युवावाम् = युवाम्, वाम्
* त चा स; स चा ह; ह चा य; आर्यभाषात होतो.
संस्कृत भाषेचा उलगडा
आर्यांचे हे दासत्व कालान्तराने जाऊन त्यांची भरभराट झाली, तथापि उपसर्गी प्रथमपुरुषसर्वनाम जे भाषेत एकदा शिरले ते कायमचेच शिरले. पुढे प्रत्ययी भाषा बोलणाऱ्याआर्यांची दुसरी एक टोळी या उपसर्गी भाषा बोलणाऱ्या आर्यांच्या टोळीला भेटली व या दोघांचा मिलाफ झाला. तेव्हा पूर्वीची नौ, न: ही प्रत्ययी रूपे पुन: बोलण्यात येऊ लागली, परंतु या जुन्या पूर्व रूपांचा उपयोग प्रमुखपणे न होता गौणत्वाने होऊ लागला. वाक्याच्या प्रारंभी नौ न: ही रूपे योजीत नसत. शिवाय यांचा स्वरही उदात्त नसे अनुदात्त असे. अनुदात्त स्वर म्हणजे नीचै:, ऱ्हस्व व अल्प असा आघात ऊर्फ निघात. नौ, न: ही रूपे अशी नमत्या स्वरांत ज्या अर्थी उच्चारीत त्या अर्थी भाषेत त्यांना प्रधान स्थान नसे हे उघड होते. तात्पर्य, अहं, आवाम्, वयम् ही रूपे वैदिक भाषेत पहलवांच्या भाषेतून आलेली आहेत. प्राचीनतम पहलव लोक वचनदर्शक स् हा शब्द योजीत, परंतु तो उपसर्ग म्हणून योजीत, प्रत्यय म्हणून योजीत नसत. म्हणजे प्राचीनतम पहलव हे आर्यभाषाच बोलत, परंतु शब्दांची रूपे प्रत्यय न लाविता उपसर्ग लावून बनवीत किंवा दुसराही एक अभ्युपगम करता येईल पहलव लोक उपसर्गी भाषा बोलत. ती भाषा आर्यभाषा असेल किंवा अनार्य भाषा असेल. पहलवांनी आर्यपूर्वजांना जिंकल्या वर, जिंकलेल्या आर्यानी पहलवांच्या चालीरीती व बोलण्याची धाटणी उचलली. त्या बरोबरच उपसर्गांनी शब्दांची वचनरूपे करण्याची पहलवांची धाटणीही आर्यपूर्वंजांनी उचलली आणि स् प्रत्ययाचा ते उपसर्गासारखा उपयोग करू लागले की अहम्, आवाम् व वयम् ही उत्तम पुरुषाची रूपे बहुश: कोणत्या तरी उपसर्गी आर्यभाषेतून वैदिकभाषेत आली.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
-३ [ खल इव खलकः = खलक ( a bad man ) कलहकः = खलक ( a quarrelsome man ) ] a thief, a highway robber, enemy.
खलाटी [ खलतिक ( mountani ) = खलटी = खलाटी ] कोंकणाच्या सह्याद्रीकडील भागाला खलाटी म्हणतात.
खवखव [ क्षवथुः क्षवः ॥ क्षव = खव ] (भा. इ. १८३४)
खवखवणें [ क्षव (खोकला) = खव. द्वित्वानें खवखवणें ] (भा. इ. १८३२ )
खवडा १ [ क्ष्वेलः = खवेडा = खवडा. क्ष्वेल् १ संचलने. क्ष्वेलातु = खवडाव ] संसाराचा खवडा करूं नको म्ह० खेळ करूं नको. ( धा. सा. श. )
-२ [क्ष्वेलू-क्ष्वेड् थट्टा करणें. क्ष्वेलिका-क्ष्वेडिका =खवेडिआ = खवेडी = खवडी. क्ष्वेडित = खवेडिआ = खवडा. क्ष्वेलित म्हणजे थट्टा, मस्करी ] (भा. इ. १८३४)
खवडाव [क्ष्वेलातुः = खवडाव ] खवडाव म्ह० खेळ-खंडोबा.
खवणा [ क्षपणक = खवणअ = खवणा (क्षौरी ) ] (ग्रंथमाला)
खवणी [ क्षपणिः = खवणी ]
खवंद, खवंदळ, [ क्षतबंध = खबंद = खबंद (खट), खबंदळ, खौंदळ. ]
खवळणें [क्ष्विड्= खिवळ = खवळणें. क्ष्विड् to roar to growl ] समुद्र खवळला म्ह० रागानें ओरडूं लागला.
खवा १ [ क्षप: = खवा ] दुग्धस्य क्षपः = दुधाचा खवा.
-२ [खव् to purify. खवा purified milk etc.)
खसकन् [ खष् १ हिंसायां ] खसकन् म्ह० क्रूरपणें मारून. ( धातुकोश-खसास २ पहा)
खसखशित [ खष् १ हिंसायाम्] Pert, dry.
खळ १ [ स्खल: = खळ. स्खल् संचलने ] खळ पडणें म्हणजे चळणें, रिकामें पडणें.
-२ [ खलि: (गाळ, बेरी ) = खळ (तांदुळांची ) ]
-३ [ खलि: = खळ. खल् संचये ] खळ म्हणजे पातळ शिजविलेल्या पिठाचा संचय.
-४ [खल pastry, thick part of curds = खळ. खलि boiled rice gruel ]
खळक [ खलुंक: ] (खलक १ पहा)
खळखळ [अख्खलीकृ ( खळखळ करणें पहा)
संस्कृत भाषेचा उलगडा
३० मह्न उच्चारांकित उत्तम पुरुषसर्वनाम व नह्नउच्चारांकित उत्तम पुरुषसर्वनाम अशा या दोन्ही सर्वनामांच्या रूपांचे मिश्रण मिश्र वैदिक समाजाच्या भाषेत होऊन पाणिनीने जी वैदिक व स्वकालीन रूपे दिली ती सुप्रसिद्ध असल्यामुळे येथे पुन: देत नाही, मह्न सर्वनामवाले उपसर्ग लावून वचनरूपे तयार करीत व न-सर्वनामवाले प्रत्यय लावून वचनरूपे तयार करीत. हे उपसर्ग लावणारे लोक कोण? व प्रत्यय लावणारे लोक कोण? न सर्वनाम झंदभाषेतही येते तिसराही एक अभ्युपगम आहे. तो असा की वैदिक आर्यांच्या पूर्वजातच शब्दांची रूपे उपसर्गानेही साधण्याचा प्रघात असे. हा प्रघात क्रियापदांच्या रूपात स्पष्ट दिसून येतो. लुङ्, लङ् व लृङ् यांत धातूंच्या मागे उपसर्ग लागून रूपे होतात. अ व अन् हे उपसर्ग शब्दांनाही पाठीमागे लागून अंतरंह्नअनंतरं, आत्माह्नअनात्मा, पुत्र:ह्नअपुत्र: अशी रूपे होतात. म्हणजे वैदिक आर्यांच्या पूर्वजात उपसर्गांने रूपे साधणारा एक समाज होता व प्रत्ययाने रूपे साधणारा दुसरा समाज होता. या दोन समाजांचा मिलाफ होऊन वैदिकसमाज उत्पन्न झाला. उपसर्गाने रूपे बनविणारा जो समाज होता तो आपली उत्तम पुरुषवाचक सर्वनामरूपे उपसर्ग लावून बनवी आणि प्रत्ययाने रूपे बनविणारा समाज उत्तम पुरुषसर्वनामरूपे प्रत्यय लावून बनवी, पैकी उपसर्गवाल्यांची छाप प्रत्ययवाल्यावर पराकाष्ठेची पडून उपसर्गवाल्यांची प्रथमपुरुषसर्वनामाची रूपे संमिश्र समाजात प्राधान्याने प्रचलित झाली व प्रत्ययवाल्यांची रूपे गौणत्वाने अधेमधे राहिली. या तीन अभ्युपगमातून हा शेवटला तिसरा अभ्युपगम सर्वात विशेष ग्राह्य वाटतो. तत्रापि त्यातही एक गोम आहे. उपसर्गवाले तरी उपसर्गाने रूपे तयार करण्याचा प्रघात कोठ्न शिकले व प्रत्ययवाले प्रत्ययाने रूपे बनविण्याची कला कोठून शिकले? मूळ, प्रत्येक समाजाने तो तो प्रघात स्वत: स्वतंत्रपणे शोधून काढला किंवा इतर आर्यानार्य समाजाच्या अनुकरणाने सुरू केला? इत्यादी प्रश्न याही अभ्युपगमा वर सुचतात. परंतु एकंदरीत हा तिसरा अभ्युपगम मला विशेष आदरणीय वाटतो. कोणताही अभ्युपगम स्वीकारा, एवढे निश्चित झंदभाषा प्रत्ययी भाषा आहे. वैदिकभाषा प्रत्ययी भाषा आहे हे अजन्त व हलन्त शब्दांची वचनरूपे पहाता सहज कोणाच्याही नजरेस येईल. फक्त उत्तम पुरुषवाचकसर्वनामाची मकारी रूपे तेवढी उपसर्ग लावून झालेली आहेत. तेव्हा ही विपरीतधर्मीं रूपे मूळची वैदिकलोकांच्या साक्षात पूर्वजांची नव्हत, दुसऱ्या कोण्यातरी लोकांची आहेत. वैदिक लोकांच्या पूर्वजांची नौ व न: ही दोनच रूपे राहिली आहेत, बाकी सर्व एकवीसही रूपे उपसर्गवाल्यांच्या भाषेतील आहेत. घरच्या रूपांना इतके पराकाष्ठेचे गौणत्व येणे आणि परकीय रूपांची इतकी बेसुमार व्याप्ती होणे व ती उत्तम पुरुषवाचक हरहमेष बोलण्यात येणाऱ्या सर्वनामांच्या रूपात होणे म्हणजे प्रत्ययी लोकांवर उपसर्गी लोकांची छाप सर्वतोपरी बसणे असा अर्थ होतो. वैदिक आर्याच्या पुरातन पूर्वजावरती असली जबरदस्त छाप बसविणारे असे हे उपसर्गी भाषा बोलणारे लोक कोण? आर्यांच्या शेजारचे उपसर्गी भाषा बोलणारे लोक म्हटले म्हणजे पहलव तेवढे दिसतात. पहलवी भाषेत उपसर्ग लावून वचनांची रूपे बनतात. अत्यंत पुरातनकाली पहलवांच्या पूर्वजांनीं वैदिक आर्यांच्या पूर्वजांना पादाक्रान्त करून आपली भाषाही बोलावयास लाविले असे म्हणावे लागते. असे दिसते की, वैदिकआर्यांच्यापैकी एका टोळीची व पहलवांच्या पूर्वजांची गाठ पडून, तीत आर्यंपूर्वज पहलवांचे अंकित दास झाले. या दास स्थितीत ते स्वभाषेला पारखे इतके झाले की, पूर्वीचे उत्तम पुरुषसर्वनामही त्यांच्या बोलण्यातून गेले व जेत्यांचे सर्वनाम हरहमेष वापरण्यात आले.
संस्कृत भाषेचा उलगडा
ही हम् या सर्वनामाची रूपे झाली. हम् हे सर्वनाम ज्या समाजात होते तो समाज प्रत्ययी भाषा बोलणारा असल्यामुळे त्याच्या हम् सर्वनामाची रूपे हलन्त सर्वनामांच्या रूपाप्रमाणे होत :
(१) हन् + स् = हम्
* हन्, हँ, हन्, असा एकवचनाचा उच्चार असे हम् सर्वनामाची म ही जशी खूण तशी हन् सर्वनामाची न ही खूण.
(२) हन् + स् + स् = हन् + अ + उ = हौन = नौ
(३) हन् + स् + स् + स् = हन् + अस् = हन: = न:
हे सर्वनाम योजणाऱ्या समाजाची गती वचनप्रत्ययापेक्षा जास्त लांब गेली नव्हती. त्याच्या भाषेत विभक्तीप्रत्यय अद्याप निर्माण झाले नव्हते. विभक्तीप्रत्ययांचे काम संप्रदान, करण, इत्याद्यर्थंक स्वतंत्र शब्द लावून होत असे. त्यामुळे हम् सर्वनामवाल्यांचा व हम् सर्वनामावाल्यांचा जेव्हा मिलाफ होऊन एक समाज बनला तेव्हा नौ व न: ही दोन रूपे द्वितीया, चतुर्थी व षष्ठी यांच्या द्विवचनी व त्रिवचनी विकल्पाने व गौणत्वाने योजिली जाऊ लागली. चतुर्थीच्या आवाभ्याम्च्या जोडीला ज्याअर्थी नौ हे रूप आहे त्या अर्थी तृतीया व पंचमी यांच्या द्विवचनाच्या जोडीलाही ते एकेकाळी असावे हे स्पष्ट आहे. तसेच द्वितीयेच्या द्विवचनाच्या जोडीला जर नौ आहे तर प्रथमेच्या द्विवचनाच्या जोडीलाही ते एकेकाळी असावे. हाच प्रकार षष्ठी स सप्तमी यांच्या द्विवचनांचा. अनेक वचनी सर्व विभक्त्यांत एकेकाळी न: हे रूप असावे. नौ व न: यांची उत्पत्ती ही अशी आहे.
संस्कृत भाषेचा उलगडा
(१३) हम् + भ्यत् = म् + अत् = मत्
* भ्य = ह्य = य =अ
* भ्य व भ्यत् प्रत्यय विशेष आहेत.
(१४) आवा + भ्याम् = आवाभ्याम्
(१५) अस्म + भ्यत् = अस्मत्
* भ्य = ह्य = य = अ
* अस्म या अनेकवचनाला भ्यत् हा प्रत्यय लागला आहे.
* प्राकृतात अह्माहिंतो व अह्मासुंतो अशी पंचमीची रूपे येतात. येथे हिंतो व सुंतो हे प्रत्यय आहेत. यांचे मूळ अभ्यन्तर् व स्वंतर् ही अव्यये आहेत. अभ्यन्तर् म्हणजे मधून व स्वन्तर् म्हणजे मधून. अभ्यन्त = (अलोप) भ्यन्त: = भिंतो = हिंतो; स्वन्त:= सुंतो; अशा परंपरेने हिंतो व सुंता हे प्राकृत प्रत्यय निघाले आहेत. मत्तो हे प्राकृत रूप मत्त: या तसिलान्त संस्कृत रूपाचा अपभ्रंश उघड आहे.
(१६) हम् + स्य =हमहम् = मम, मम (अकच्) = ममक हम् + स्य = म + य = म + इ=मे
हम् + स्य = मह्य
* स्य आणि स्म ही एकाच प्रत्ययाची दोन रूपे आहेत हे मागे दाखविलेच आहे.
* मे,मम, मह व मज्झ ही रूपे मे, मम व मह्य याचे अपभ्रंश आहेत, अथवा, वास्तविक म्हटले म्हणजे समकालीन पर्याय आहेत ह्न प्राकृत सर्वंनामरूपासंबंधी अपभ्रंश हा शब्द प्रस्तुत विवेचनात जेथे जेथे येईल तेथे तेथे त्याचा अर्थ अपरपर्याय असा समजावा.
(१७) आवा + स्योस् = आवायो: = (उच्चारसुखार्थ ) आवयो:
अस्माँ + स्याम् = अस्माँ + आम् = (अनुनासिकाचा न् होऊन ) अस्मानाम्
(१८) अस्मह् (अकच् ) = अस्माक
अस्माक + स्यम् = अस्माक + अम् = अस्माकम्
* मम ला अकच् प्रत्यय लागून ममक (मम एव) रूप होते, त्यापासून तद्धित मामक, मामकीन, त्याप्रमाणेच अस्मह् ला अकच्प्र त्यय लागून व ह् याचा उच्चार अ च्या जवळजवळ असल्यामुळे स्वर समजून अस्मह्क असे रूप होई व अस्मह्क या रूपातील ह् चा अ होऊन अस्माक असे रूप होई. अस्माकपासून तद्वित आस्माक व आस्माकीन. अस्माक ला स्यम् प्रत्यय लागून व अ चे पूर्वरूप होऊन अस्माकम्.
* प्राकृतात षष्ठीच्या अनेकवचनी मज्झ, अह्ये, अह्य, अयाणं अशी रूपे येतात,
त्यांची साधनिका :
अस्मह् + स्य = (अलोप हम ह्य = मह्य = मज्झ )
अस्मह् + स्य = अस्म् + ह्य = अस्म् + य = अस्म् + अ = अस्म् = अह्य,
अह्ये (य = इ)
अस्मानाम् = अह्माणं
(१९) हम् + स्यि = मयि, ह्मयि
(२०) षष्ठीद्विवचनवत्
(२१) अस्मा + सु = अस्मासु
अस्मे + सु = अस्मेषु
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
-३ [ क्षतिः = खइ = खय = खै ]
खरकटणें, खरकाटणें, खरकुटणें [ खरकटें den मराठी ] to be fould with खरकटें.
खरखरित [ खर (harsh, rough) = (द्विरुक्त) खरखरित ]
खरखरीत [ खरखरित = खरखरित-रीत. स्वरः सूक्ष्मश्चलोऽनिल: । वाग्भट-सूत्रस्थान ] खर म्हणजे खडबडित. (भा. इ. १८३४)
खरडपट्टी [ खर्दपट्टिका = खरडपट्टी] खरडपट्टी म्ह. कठोर बोलणें. मूळ अर्थ दंश करून कातडीचा टवका काढणें.
खरपूस १ [ खलपू: (खलं पुनाति) = खरपूस समाचार, मार (असा मार कीं मारलेल्याचा दुष्टपणा नाहींसा होईल) ]
-२ [खलपूः (खले पूयते) = खरपूस धिरडें (खलांत म्हणजे तव्यांत पूर्ण भाजलेलें धिरडें)]
खरपें [ खरत्व roughness, harshness = खरपें ] रूक्षपणा.
खरांटणें [खरांटा den मराठी ] to become like a खराटा, a tree etc.
खराटी [क्षरयष्टि = खराटी (स्त्री.) खराटा (पु.) ] स्त्रीलिंगापासून पुल्लिंग निघालें आहे. (भा. इ. १८३४)
खराब [खर्बः mutilated= खराब] dwarfed, low. तो खराब माणूस आहे, he is a cripple, low fellow.
खरारा [ खरालिक: razor = खरारा]
खरूज १ [ खर्जू = खरूज ] (भा. इ. १८३४)
-२ [ खरु (द्वाड माणूस, मूर्ख) + ज = खरूज ] ही खरूज कोठून आणलीस ? म्हणजे हा मूर्ख किंवा द्वाड माणूस कोठून आणलास ? (भा. इ. १८३६ )
खरखटें [ कुर्कुट: (केरकचरा) = खुर्खुटें = खर्खटें. उ = अ ] एकदां खर्खटें काढून टाका म्ह० केरकचरा काढून टाका.
खर्डा [ खर्दः = खर्डा. खर्द् हिंसायां ] खर्डा म्ह० हिंस्त्र वाघ.
खल [खल्ल: = खल (दगडाचा ) ]
खलक १ [खलुंक: (जैनग्रंथ) = खलक खळक, खलुंकः अविनीतः ]
-२ [ खल एव खलक: खल = कर्णेजपेऽधमे (हेमचंद्र १२०८ ) ]
खलक म्ह० फितुरी, असा शब्द व अर्थ मराठ्यांच्या इतिहासाच्या आठव्या खंडांतील २८ व्या लेखांत आला आहे. हा २८ वा लेख शिवाजीचा आहे. (ग्रंथमाला)
संस्कृत भाषेचा उलगडा
ही रूपे अत्यंत प्राचीन अशा पूर्ववैदिकसमाजाच्या भाषात प्रचलित होती. त्या समाजाची गती वचनांची रूपे साधण्याकपलीकडे गेली नव्हती. पुढे द्वितीयादी विभक्तीप्रत्यय लावण्याचा प्रघात पडून वैदिकभाषेत व वैदिकसमकालीन प्रांतिकभाषात विभक्त्यांची रूपे इतर शब्दांच्या रूपांप्रमाणे साधली गेली. त्या रूपांची साधनिका येणेप्रमाणे :
(४) हम् + म् = हम् म् = मम्, माम् , मा
* प्राकृतात मम् हे रूप येते.
(५) आवाम् + म् = आवाम्
(६) अस्माँ + म् = (अनुनासिकाचा न् होऊन) अस्मान्म् = अस्मान्
अस्मह् + म् = अस्मह् अस्मे + म् = अस्मे
(७) हम् + स्या = हम् + या = हम् + या = मया
हम् + स्ये = ह्य + ह्ये = हम् + ये =मये
* प्राकृत मे, मईं, मए ही रूपे मया व मये या रूपांचे अपभ्रंश आहेत.
(८) आवा + भ्याम् = आवाभ्याम्
(९) अस्मा + भिस् = अस्माभि:
अस्मे + भिस् = अस्मेभि:
* प्राकृत अह्यहिँ हे रूप पूर्ववैदिक अस्मेभि: चा अपभ्रंश किंवा वास्तविकपणे
भ् चा ह होऊन व स् चा ह होऊन अह्येहिँ हे रूप पूर्ववैदिक अस्मेभि: या रूपाचा समकालीन पर्याय आहे.
(१०) हम् + भ्य = म + ह्य = म + य = म + इ = मे
हम् + भ्यम् = मह्यम् , मभ्यम्
* भ्य = ह्य
(११) आवा + भ्याम् = आवाभ्याम्
(१२) अस्म + भ्यम् = अस्मभ्यम्, अस्माभ्यम्, अस्मेभ्यम्
अस्मा
अस्मे
* भ्यस्च्या ऐवजी भ्यम् प्रत्यय विशेष आहेत.
संस्कृत भाषेचा उलगडा
२९ पूर्ववैदिकभाषात कंठ्य उच्चाराचे प्राबल्य विशेष असे म्हणून वर सांगितले ह्न त्या भाषात कित्येक समाज कंठ्य: सचा उच्चार बहुतेक ह् सारखा करीत आणि कित्येक समाज कंठ्य: स् चा उच्चार बहुतेक वैदिक स् सारखा करीत; पैकी ह् उच्चार करणारे समाज प्रथमेचे अनेक वचन वयम् असे उच्चारीत. स् उच्चार करणारे जे समाज होते त्यांचे अनेकवचन येणेप्रमाणे साधे :
(३) स् + स् + स् + हम् = ह् + स् + स् + हम् = अ + स्स् + हम् = अस्मह् = अस्म
ह् = अस्म्ह् , अस्म , अस्माँ, अस्मे.
साधे, बने, करीत वगैरे क्रियापदे रूपासंबंधाने योजिलेली पाहून, असा समज होण्याचा क्कचित् संभव आहे की पूर्ववैदिक रानटी समाज प्रकृती, उपसर्ग प्रत्यय वगैरे अवयव घेऊन त्या त्या रूपांची सिद्धी, बनावट व कार्ये ज्ञानत: जाणूनबुजून करीत असावे. तर असा समज करून घेणे युक्त नव्हे. ते रानटी समाज भाषाविषयक सामाजिक स्फूर्तीने रूपांचा उच्चार करीत, रूपांची सिद्धी करीत नसत. साधे, वन इत्यादी क्रियाशब्द आपण जे वर्तमानकालीन वैय्याकरण व शाब्दिक योजतो ते रूपांचे पृथक्करण करणारे शास्त्रज्ञ या नात्याने योजतो ह्न असो. कंठ्य: स् चा ह् उच्चार करणाऱ्या व स् उच्चार करणाऱ्या अशा दोन्ही समाजाची वचनांची एकंदर रूपे अशी :
१ ३ २
अहम् आवाम् वयम्
कहम् आवा अस्मह्
हम् अस्मा, अस्माँ
अस्म
अस्मे
* प्राकृतभाषातील हम् हे वेदपूर्वकालीन हम् हे रूप आहे. प्राकृतातील अहअम् हे रूप अहकम् (अकच्) या रूपांचा अपभ्रंश.
* प्राकृतातील अह्य हे रूप पूर्ववैदिक अस्मे चा अपभ्रंश.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
खंत [ क्षांति = खंति = खंत ] (भा. इ. १८३६)
खतरूड [ खट्वारूढः (मूर्ख) =खटरूड = खतरूड]
खंतावणें [ खंत - ती den मराठी ]
खतैल ( ला-ली-लें ) [क्षताविल = खतैल (ला-ली-लें)] covered with wounds.
खत्रूड [ क्षत्रगंडः = खत्रूड ] a bad क्षत्रिय.
खंदक [ स्कंधक = खंदक ] (भा. इ. १८३४)
खंदा [ स्कंदक ( शूर) = खंदा ] खंदा वीर.
खंद्य (द्या - द्यी-द्ये) [ महोक्षः स्यादुक्षतरः स्कांधिक: स्कंधवाहक: (अमर - द्वितीयकांड - वैश्यवर्ग - ६१ टीका अमरविवेक) स्कांधिक = खंदिअ = खंद्य (द्या-द्यी-द्यें ) ] खंद्य म्ह० खांद्यानें ओढण्याला समर्थ, कर्ता, समर्थ. खंद्या माणूस = समर्थ माणूस. (भा. इ. १८३३)
खंद्या [ स्कंधिक: (गाडी ओढणारा बैल) = खंद्या (efficient)
खनाळें [ खनि + लयनं = खणाळें, खनाळें ] a cave dug out or scooped out in the rock.
खपणें १ [ क्षपण = खपण = खपणें ] मरणें, मरे तों काम करून दमणें. ( ग्रंथमाला)
-२ [ क्षपणं = खपणं ] मरणें. (भा. इ. १८३४)
खपरेल [खर्परगृहं=खपरार= खपरेल] थाप्या कौलांचें घर.
खप्पा [ खप्प = खप्प (पा-पी-पें) उष्णादि ३१५ खष्पौ क्रोधबलात्कारौ ] (भा. इ. १८३३)
खप्पी ९ [ खष्पौ क्रोधबलात्कारौ (उणादि ३१५). खष्पिन् = खप्पी ] बलात्कारानें वर्तणारा. (भा. इ. १८३३)
-२ [ ख्याप्यः = खप्पा ] Notorious. भला खप्पी आहे is altogether a notorious man.
खबूतर [कपोतक] (कबूतर पहा)
खमकावणें [ कार्यक्षम = खमक्या able. खमक्या den खमकावून ably ]
खमक्या १ [ क्षमकः able, efficient = खमक्या ] able, efficient.
-२ [कर्मक्षमः = कमखा = खमक्या] कोणतेंही जोखमीचें काम करण्यास योग्य.
खय १ [ क्षय = खय. क्षति = खइ. क्षेय = खेच ] ( धा. सा. श. )
-२ [ क्षय = खय. क्षाय = खाय. क्षति = खइ, खय ] तुला खइ लागली = ते क्षयः लग्नः