Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

ही हम् या सर्वनामाची रूपे झाली. हम् हे सर्वनाम ज्या समाजात होते तो समाज प्रत्ययी भाषा बोलणारा असल्यामुळे त्याच्या हम् सर्वनामाची रूपे हलन्त सर्वनामांच्या रूपाप्रमाणे होत :

(१) हन् + स् = हम्
*न्, हँ, हन्, असा एकवचनाचा उच्चार असे हम् सर्वनामाची म ही जशी खूण तशी हन् सर्वनामाची न ही खूण.
(२) हन् + स् + स् = हन् + अ + उ = हौ = नौ
(३) हन् + स् + स् + स् = हन् + अस् = ह: = न:

हे सर्वनाम योजणाऱ्या समाजाची गती वचनप्रत्ययापेक्षा जास्त लांब गेली नव्हती. त्याच्या भाषेत विभक्तीप्रत्यय अद्याप निर्माण झाले नव्हते. विभक्तीप्रत्ययांचे काम संप्रदान, करण, इत्याद्यर्थंक स्वतंत्र शब्द लावून होत असे. त्यामुळे हम् सर्वनामवाल्यांचा व हम् सर्वनामावाल्यांचा जेव्हा मिलाफ होऊन एक समाज बनला तेव्हा नौ व न: ही दोन रूपे द्वितीया, चतुर्थी व षष्ठी यांच्या द्विवचनी व त्रिवचनी विकल्पाने व गौणत्वाने योजिली जाऊ लागली. चतुर्थीच्या आवाभ्याम्च्या जोडीला ज्याअर्थी नौ हे रूप आहे त्या अर्थी तृतीया व पंचमी यांच्या द्विवचनाच्या जोडीलाही ते एकेकाळी असावे हे स्पष्ट आहे. तसेच द्वितीयेच्या द्विवचनाच्या जोडीला जर नौ आहे तर प्रथमेच्या द्विवचनाच्या जोडीलाही ते एकेकाळी असावे. हाच प्रकार षष्ठी स सप्तमी यांच्या द्विवचनांचा. अनेक वचनी सर्व विभक्त्यांत एकेकाळी न: हे रूप असावे. नौ व न: यांची उत्पत्ती ही अशी आहे.