Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(१) प्रजापति ष्ट्वा नियुनक्तु मह्यभ् (पारस्कर-कांड १ कंडिका ८ वाक्य ८).
(२) पांडव हे तिबेटातून आले. कौरव हे काश्मीरातून आले. पांडवांत Polyandry (बहुपतित्व) होती. कौरवांत Polygamy (बहुपत्नित्व) होती. पांडवांत शिवाय प्रत्येक भावाला निराळी बायको होती, म्हणजे पृथक् लग्ने करण्याची चाल पडत चालली होती. कौरवांत एका गांधारीला १०० पुत्र झाले; व ते कुंभात रुजत ठेविले होते. कुंभ म्हणजे घट, एक घर, अनेक स्त्रियांपासून धृतराष्ट्राला जे पुत्र झाले ते सर्व पट्टराणी जी गांधारी तिचे समजले जात. गांधारीला कन्या एकच होती. म्हणजे कन्याहत्या कौरवांत होती हे उघड झाले.
(३) पंजाबात Marriage (विवाह) फार स्वैर असे. ते कां ? तर पूर्वेकडील जे कौरव-पांडव त्यांच्याहून नंतर पंजाबातील आर्य पंजाबात शिरले व त्यांच्यात कौरवपांडवांच्या इतकी सुधारणा अद्याप लग्नाच्या बाबतीत झाली नव्हती. अनेक टोळ्या निरनिराळ्या संस्कृतीच्या व कालाच्या अंतराअंतराने हिंदुस्थानात शिरल्या, त्याला हे प्रमाण आहे.
(४) नृप= Feeder of leading men. नेत्यांना पोसणारा.
नृनाथ=One who is obsequeously obliged by नृ s. नरनाथ,
नंतर उपकृत केला गेलेला.
राजन् = One who entertained नृ s. आतिथ्य करणारा feudal words; when leaders were beseeched and followers were rewarded. सरंजामशाही समाजातील शब्द. जेव्हा नेत्यांना विनंती केली जाई आणि अनुयायांना बक्षिसे दिली जात.
पृथ्वीपति, पार्थिव, भूपति lords of earth, dominins.
(५) गोविंद = Obtainer of cows - गाई मिळविणारा.
गोपाळ= Protector of cows–गाईचे रक्षण करणारा.
कृष्ण = One who loots.- लूटमार करणारा.
हरि=One who lifts cattle.-जनावरे चोरणारा.
देवकीनंदन=Son of देवकी (देवकीचा पुत्र), mother name
आईचे नाव.