Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
हें १ [ इति = इइ = ई= ही = हें ] अहं गच्छामि इति उक्त्वा = मी जातीं हे म्हणून; वयंगच्छामः इति उक्त्वा = आम्ही जातीं हें म्हणून; येथें इति व हें अव्ययें आहेत. (भा. इ.१८३४ )
-२ [ एतद्, इदम् व अदस् पासून तीन ह निघतात. पहिले दोन ह सन्निकृष्ट अर्थ दाखवितात व तिसरा ह विप्रकृष्ट अर्थ दाखवितो. प्रकृतस्थलीं सन्निकृष्टार्थक ह आहे. तेव्हां तो एतद् किंवा इदम् पासून निघालेला समजावा. हा, ही, हें.] (ज्ञा. अ. ९ पृ. १)
हेकट [ इतिकथ (दुष्ट) = हेकट ]
हेंका, हेंकांडणे [ इदं-किमितिका = हेंका ] हेंका म्हणजे हें असें कां असा हट्ट धरणें. ( धा. सा. श. )
हें कां करणें [ इदं किमितिका ] to ask reason there of.
हेंगाडा १ [ इंगतानभिज्ञः = एंगाडा = हेंगाडा ]
-२ [ एककांड: ] (धातुकोश-हेंगाड २ पहा)
-३ [ इतिकथ deviating from the rules of his caste, lawless = हेंगाडा ] हेंगडी भाषा, कृति, जाति.
हेटकर [ हेतिकर = हेटिकर = हेटकर ] हेति म्हणजे कुर्हाड, परशु. (भा. इ. १८३४)
हेटकरी [ हेतिकराः = हेटकरी ] हेति म्हणजे फेकण्या हत्यार.
हेटाळणें [ हेडन = हेटाळणें.
यद्देवा देवहेडनं देवासश्चकृमा वयं।
(शुक्लयजुर्वेदसंहिता-अध्याय २०-कडिका १४) हेड असा मूळ धातु. त्याला आळ प्रत्यय लागून मराठी हेटाळ. ड् = ट् ] हेडनं म्हणजे अपराध. हेटाळणें म्हणजे अपराध करणें, उपमर्द करणें. (भा. इ. १८३७)
हेडा, हेड्या [ हिंडकः = हिडा = हेडा, हेड्या. हिंड् गतौ हिंडक = हिंडगा. ] गुरांचे कळप घेऊन हिंडणारे.
हेंदारें [ हिंडीर: a man, a male ] सैरावैरा चालणारा गचाळ मनुष्य. (ज्ञा. अ. ९ पृ. १४३)
हेदू [ हेमदुग्ध = हेदू ] वृक्षनाम.
हेर [ निशाचरो गूढनरो हेरिकः प्रणिधि श्च सः ॥ १६८ ॥
धनंजयकोश. हेरः एव हेरिकः ॥ ] (भा. इ. १८३३)
हेल, हेलकरी [ हेलः = हेल ] हेल म्हणजे लग्न समारंभाच्या वेळीं पाणी वगैरे घालून मजा, करमणूक करणे. हेलकरी म्हणजे अशी करमणूक करणारी माणसें. त्यावरून दुसरा अर्थ ओझेवाला.