Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
२ वाहाणा रूप संस्कृत उपानहौ या रूपावरून निघालेलें नाहीं. अक्षरविपर्यास झालेल्या जुन्या मराठी उपाहाणौ या रूपा वरून झालेलें आहे. संस्कृत उपानहौ पासून अपभ्रंश येणेंप्रमाणें होतील:-
उपानहौ = (उ लेप) वाणहौ = वाणहा
जुन्या मराठींत उपानहौ हें संस्कृत रूप येतांना प्रथम अक्षरविपर्यास होऊन उपाहाणौ असें रूप झालें व त्याचे वर्तमान मराठींत अपभ्रंश येणें प्रमाणें झाले :-
उपाहाणौ = (उ लोप) वाहाणौ = वाहाणा
उघड आहे कीं वाहाणा हें रूप अपभ्रष्ट उपाहाणौ या रूपापासून निघालें आहे.
३ मराठींत आद्य उ चा लोप होण्याची लकब आहे. उदाहरणार्थ-
१ उपास्थापनं = (उलोप) पाठवणें = पाठवणें. उपास्था म्ह० ( कोणत्याहि वस्तूकडे) जाणें. उपास्थापन (णिच्) म्ह० जाववणें.
२ उपोहनं = पोहणें
३ उपाध्याय = पाध्या
४ उपविश् = बइस = बैस
५ उपवादः=पवाडा ( निंदा) (हा अर्थ ज्ञानेश्वरींत येतो).
६ उपनमनं = वणवणें = ओणवणें
७ उपधारणं = पधारणें (गुजराथी ) (भा. इ. १८३७ पृ. १८५)
उपेरणें [ उपारंधनि = उपेर्हाणँ = उपेराणँ = उपेरणें उपरणें ] उपेरणें असा उच्चार करतात व तो शुद्ध आहे. (भा. इ. १८३३)
उफळणें [फुल् संचलने ] ( फुलें पहा)
उफाडा १ [ उत्फाल: = उफाडा ] उत्फाल म्ह० जोरानें विकास पावणें. (भा. इ. १८३७)
-२ [ फल् १ निष्पतौ. उत्फाल: = उफाडा]
उत्फालय् = उफाडणें (to expand by spliting).
उ०-मुलगी उफाड्यानें वाढते आहे म्ह० grows as it splitting like a शिताफळ ( धा. सा. श.)
उफ्राटें [ अवभ्रट a turned up flat nose = उफ्राटें ] उलटें वसकें फेफटें नाक.