Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
उपस [ उपसह् मर्षणे ] उ०- नाना दुःखें उपसलीं to bear.
उपहुढ [उत्+ प्रस्वापः ] (धातुकोश-उपहुड २ पहा)
उपळसरी १ [ उत्पलशारिवा = उपळसरी]
-२ [ उत्पलसारिवा = उपळसरी ] (भा. इ. १८३६)
उपळा [ उत्प्लवः = उपळा ] उत्प्लव म्हणजे वर तरंगणें, येणें; पाण्याचा उपळा म्ह० वर येणें. (भा. इ. १८३७)
उपाइल ( ला-ली-लें) १ [ ( वैदिक ) उपम excellent, best + ल (स्वार्थे) = उपाइल (ला-ली-लें)] उत्कृष्ट, मोठें.
-२ [ उत् + प्री to love णिच् प्राययति ( बोपदेव ) निष्ठा उत्प्रायित + ल = उपाइल ( ला-ली-लें ) ] आवडतें:
उपाई [ उत्पादः = उपाईं] पुढले दोन पाय उभारून मागल्या पायांवर घोड्यानें उभें रहाणें.
उपास १ [ उप + अश् ९ भोजने ] ( धातुकोश उपास १ पहा)
-२ [ उपवासः, उपवासनं = भोजननिवृत्तिः उपान्वध्याड्वसः, ( १-४-४८) या सूत्रावर कात्यायनानें खालील वार्तिक रचिलें आहे.
वसे रश्यर्थस्य प्रतिषेधो वक्तव्यः ग्रामे उपवासति = भोजननिवृत्ति करोति । उपवास = उपआस = उपास उपोषण ( भोजननिवृत्तिः ) ] (भा. इ.१८३३)
उपाहाणौ - हा द्विवचनान्त शब्द ऊर्फ हें द्विवचनान्त रूप मानभावांच्या (लीलाचरित्र नामक) ग्रंथाच्या ७ सातव्या लीलेंत आलें आहे, तें असें :-
श्रीचरणीं उपाहाणी घातलींयां ॥
मूळ संस्कृत रूप उपानहौ. अक्षर विपर्ययानें उपाहाणौ असा अपभ्रंश सहाशें वर्षांपूर्वीच्या मराठींत झाला. द्विवचनें मराठी अपभ्रंशांत हि कायमच होत हें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. उपाहाणौचा अपभ्रंश वर्तमान मराठींत वाहाणा. तात्पर्य, वाहाणा हें रूप स्वरूपतः द्विवचनी आहे. आणि ज्या अर्थी उपाहाणौ हा कर्ता द्विवचनी आहे, त्या अर्थी घातलींयां हें क्रियारूप हि द्विवचनींच आहे. ग्रहिते असें मूळ संस्कृत द्विवचनी रूप. ग्राहिताचें मराठी घातली ( स्वार्थक ल प्रत्यय). घातलीचें द्विवचन घातलीया. मराठींत द्विवचनी व बहुवचनी रूपें एकसारखींच असतात. सबब, द्विवचनी रूप कोणतें व बहुवचनी रूप कोणतें तें कर्त्याच्या रूपावरून ओळखावयाचें असतें. मानभावी ग्रंथांत प्रस्तुत द्विवचनी रूप साक्षात् असल्यामुळें, जुन्या मराठींत द्विवचनी शब्दांचा व धातूंचा उपयोग क्वचित् होत असे, असें जें विधान मीं आपल्या ज्ञानेश्वरी-व्याकरणांत केलें आहे त्याला बळकटी येते.