Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
लाघव [ श्लाघिमा = लाघव ] कवीचें लाघव म्हणजे स्तुति करण्याचें कौशल.
लाघवी [ श्लाघाविन् = लाघावी = लाघवी ] लाघवी म्ह० हांजी हांजी करणारा, मर्जी संपादन करणारा. लाघावी व लाघवी हीं दोन्हीं रूपें भाषेत प्रचलित आहेत. (भा. इ. १८३४)
लाँच [(स्त्री) लंचा = लाँच (स्त्री)] (भा. इ. १८३४)
लाज १ [ लज् to cover अपवारणे (आच्छादणें)= लाज (कासोटा) ] त्यानें माझी लाज काढली म्हणजे कासोटा फेडला.
-२ [ लज् १ प्रकाशने. लंजा = लाज ] दिव्याची लाज म्हणजे प्रकाश. ( धा. सा. श. )
-३ [(पुं.) लंज (कासोटा) = लाँज = लाज (स्त्री)] लाज म्ह. कासोटा. त्यानें लाज सोडली आहे म्हणजे कासोटा सोडला आहे. कोणी बाई म्हणते:- त्यानें माझी लाज काढली म्हणजे त्यानें माझा कासोटा फेडला. (भा. इ. १८३४)
-४ [ लज् १० अपवारणे ] लाज काढली. (धा. सा. श.)
लाजाळूं [ लज्जालुः = लाजाळूं ]
लाट १ [ राध् - राधः good fortune, prosperity = लाट ] prosperity, gain. लाट लागला.
-२ [ अरघट्ट ] ( रहाट पहा )
-३ [ रत्निः (पुं. स्त्रि.) (Elbow to fist) = लाटण = लाट = लाटणें ] हाताची लाट, लाटण.
-४ [ लाटः (जीर्णालंकार) = लाट (आकस्मिक लाभ) ]
लाटण [ रत्निः ] (लाट ३ पहा)
लाटणें [रत्नि = लटणि = लाटणी = लाटणें ] (भा. इ. १८३६)
लाड [ ह्राद्, ल्हाद् १ सुखे. ह्राद: ल्हादः = लाड. हादिनी = लाडण ] लाड, करणें म्ह० सुख होईल असें वागवणें. ( धा. सा. श. )
लाडका [ ह्लाद् १ सुखे. ह्लादक: = लाडका ]
लाडण [ ह्लादिनी] ( लाड पहा )
लाथ [ लत्ता ]
लाथाडणें [ लृत्तास्तृतं = लाथाड, लाथाडणें (+णें)
संस्तृत = संथड (जैनमहाराष्ट्री) उपस्तृत = उपत्थड (जैनमहाराष्ट्री) ] (भा. इ. १८३६)
लापट [ लंपट = लापट ]