Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

लड्ड १ [श्लथ=लड्ड ] तो माणूस लड्ड आहे म्हणजे शिथिल आळशी, मंद आहे.

-२ [ लट्टः ( childish, stupid) = लड्ड ]

लढ् (to fight) युद्ध करणें.   [ १ लढणें. २ लढाई. ३ लढा. ४ लढवय्या. ५ लढाऊ. पाणिनीय धातुपाठांत रध हिंसासंराध्योः असा धातु आहे. हिंसार्थी रध् आहे. र चा ल् व ध् चा ढ् होऊन लढ् हें महाराष्ट्रीतून अपभ्रंश द्वारा मराठींत रूप आलें आहे. लढ् चा मूळचा अर्थ ठार मारणें. द्वितीयार्थ युद्ध करणें. तृतीयार्थ भांडणें; ईरेस पडून त्वेषानें वाद करणें; इत्यादि ] (भा. इ. १८३२)

लत्ता [ नक्तकः, लक्तकः = लत्ता ] लत्ता म्हणजे कपडा.

लपेटणें [ वेष्ट् १ वेष्टने. लतावेष्टनं = लतेटणें = लपेटणें ] लतावेष्टन म्ह० आलिंगन. ( धा. सा. श.)

लफ्फा [ लक्ष्मन्=लफ्फ= लफ्फा ] बायकांच्या लुगड्याचा किंवा पैठणीचा जो कलाबतूचा किंवा रेशमाचा पदर त्याला लफ्फा म्हणतात.

लब [ लक्ष्मन् characteristic, mark = लकत characteristic, लबक, लब (मिश्यांची लब, घेर्‍याची लव)

लबक [ लक्ष्मन् ] (लब पहा)

लबका [ लिप् उपदेहे. उपदेहो वृद्धिः. लिप्तकः = लबका ] चिखलाचा लबका म्हणजे लिबलिबित गोळा. (धा. सा.श.)

लबलव, लबालब [लबि शब्दे] (ग्रंथमाला)

लमाण [ लोहवणिक् = लोहवाणि (कुडें, शिलालेख नं. २०) = लोहवाण = लहवाण = लव्हाण अथवा लमाण ] (ग्रंथमाला)

लय १ - लय काल, लय वेळ, लय पीक असे शब्द गांवढे योजतात. येथें लय म्हणजे अंत. लय वेळ म्हणजे मर्यादातिक्रान्त वेळ; अमर्याद वेळ; अति फार वेळ; अर्थात् लय म्हणजे फार, पुष्कळ, अति, अमर्याद. (भा. इ. १८३२)

-२ [ रयस् velocity = लय ] continous, much लयलूट much exessive gain.

लला [ ललक = ललअ = लला (ली-लें) ललक = लडक (का-की-कें)] लला म्हणजे मूल किंवा लाड. ललक म्हणजे लाड. (ज्ञा. अ. ९ पृ. ४ )

लल्ल [ ललकक ] (लडका पहा)

लल्लाट [ ललाट = लल्लाट ] (स. मं.)

लल्लु [ ललकक ] ( लडका पहा )