Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ल
लकडा [ लकुट: , लगुड: ] ( लांकुड पहा )
लकड्या [ लागुडिक: = लकड्या ] पहिलवान, one with a stick, भालदार.
लकतर [ लक्तक (चिंधी) + तर = लकतर ] फाटकी चिंधी.
लकव [ लक्ष्मन् ] (लव पहा)
लंका [ लंका = दुराचारी स्त्री ] प्रस्तुत लहान पोरींना विनोदानें अपशब्दार्थी किंवा अवगुणार्थी लावतात. (भा. इ. १८३२ )
लक्ती [ (लक्तक) लक्तिका = लक्ती ] फाटकें वस्त्र. लक्ती = रगटी-टें. (भा. इ. १८३७)
लखलखणें [ लप ( ख ) कांतौ ] (ग्रंथमाला)
लखलाभ १ [ लखलाभ = लाखलाभ. लाखृ अलमर्थे लखलाभ = पुरेसा लाभ ] (ग्रंथमाला)
-२ [ लास् to be sufficient ] तुझें द्रव्य तुला लखलाभ होवो be sufficient to you.
लग [ लकः an ear of wild rice = लग ]
लंगड (डा-डी-डें ) [ लंग = पायानें व्यंग ] (भा. इ. १८३२)
लंगडणें [ लंग् ( लंगडणें ), लंगट = लंगड. लंगटति = लंगडणें ] लंगडणें हा नामधातू आहे.
ट व ड ज्या कित्येक मराठी धातूंत येतात ते धातू, नामधातू होत. ( धा. सा. श. )
लंगणें १ [लंघ् १ क्षये. लंघनं (क्षय पावणें ) = लंगणें ] ( धा. सा. श.)
-२ [ लंग् १ गतौ = लंगणें ] लंघनानें मी अगदीं लंगून गेलों म्हणजे दुर्बल झालों. लंघ धातू निराळा व लंग निराळा. (धा. सा. श.)
लगतरी [ लक्तक + वस्त्र = लगतअअर = लगतर (रो-रें)] लक्तक म्हणजे फाटकें वस्त्र, फटकूर. (भा. इ. १८३७)
लंगर [ अलंकार = ( अलोप ) लंगार = लंगर ] नवरा गळ्यांत सोन्याचे लंगर घालील कीं, या वाक्यांत लंगर म्हणजे अलंकार.
लंगरसोनें [ अलंकारसुवर्ण = लंगरसोनें ]
लगाम [ ललाम ( अश्वभूषा ) = लगाम ]