Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
रुका १ [ रुक्न (सुवर्ण, लेखंड ) = रुक्क = रुक, रुक्मकः = रुका ] एक कानिष्ठ नाणें. (भा. इ. १८३२)
-२ - भोजप्रबंधांत रुक्म म्हणून एका नाण्याचा उल्लेख आहे:-
" ततो बाणाय रुक्माणां पंचदशलक्षाणि प्रादात् ” भोजानें बाणाला पंधरा लाख रुक्म दिले, असें बल्लाल लिहितो. रुक्म या शब्दाचा अर्थ सोनें किंवा लोखंड असा आहे. पंधरा लाख सोन्याचीं नाणीं भोजानें दिलीं असतील हें संभवत नाहीं. तेव्हां लोखंडाचे पंधरा लाख रुक्म भोजानें दिले असावे, असा पक्ष रहतो. तेव्हां रुक्म हें नाणें काय होतें ? रुक्मः या शब्दाचा मराठींत अपभ्रंश रुका. रुका असा होतो व होत आहे. सरासरी १८ रुक्यांचा एक आणा होतो व १६ आण्यांचा एक रुपया होतो. म्हणजे एक लाख रुक्मांचे सध्याच्या मानाचे सरासरी पांचशे किंवा साडे पांचशें रुपये होतात. भोजानें शेंकडों कवींना लक्षलक्ष नाणीं दिलीं. हीं नाणीं सोन्याचीं होतीं, असें समजल्यास कुबेराची ही संपत्ति पुरली नसती. सबब रुक्म हें अगदीं हलकें नाणें भोजाचे वेळेस होतें असें म्हणावें लागतें. हें भोजाच्या वेळचें रुक्म नाणें पेशवाईतील किंवा शिवकालीन रुक्का या नाण्याचें च पूर्वज आहे.
रुकार [ रै करोति (अव्ययप्रकरणम्, ददाति) = रुकारतो ] रुकारणें म्हणजे देणें, होय म्हणणें. (भा. इ. १८३४)
रुकार, रुकारणें - [ ऊरुरीकार: = (उलोपे ) = रुकार ] रुकार म्हणजे मान्यता. ऊरुरीकरणं = रुकारणें. ( धा. सा. श. )
रुखरुखित १ [ रूक्ष harsh द्विरुक्त = रुखरुखित ] very harsh, rough.
-२ [रूक्षरूक्षित = रुखरुखित ] (भा. इ. १८३४)
रुचा [ऋच्छका (इच्छा) = रुचआ = रुचा ] रुचि शब्द निराळा.
रुचीबेरुची [ रुचिविरुचि = रुचीबेरुची ] विरुचि = वाईट रुचि. (भा. इ. १८३४)
रुंद [ वृंद = वुंद = रुंद. वृंदिष्ट = वुंदिट्ट = रुंदट ] ( भा. इ. १८३२ )
रुपया [ रूप्यकः ] ( निप्क पहा )