Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
र
रखेली [ रक्षिता = रखिल्ला = रखेली ] (स. मं.)
रगटी-टें [ लक्तिका ] ( लक्ती पहा )
रगड १ [ ह्रग् १ संवरणे. ह्रगितं = रगड ] रगड म्हणजे पुरेसें, पुष्कळ, आच्छादण्यासारखे. ( धा. सा. श. )
-२ [ लगड pretty, handsome = रगड ] Pretty, plenty.
रंगणास आणि [ रंह् १ गतौ ] (धातुकोश-रंघव पहा)
रगत [ रक्त = रगत ] रात किंवा राक असा अपभ्रंश नियमाप्रमाणें न होतां, मराठींत रगत अपभ्रंश झालेला आहे.
भक्त = भगत क्रिष्ट = किळ्सट्
शक्त = सकत लुब्ध = लुबड
फक्त = फकत भृष्ट = भाजट
तख्त = तखत कुष्ट = कुजट
वख्त = वखत घुष्ट = घुसळ
संस्कृतांत किंवा इतर भाषांत ज्या शब्दाचे अन्त्य क्त, ख्त, ब्ध, ष्ट हीं जोडाक्षरें असतात, त्या शब्दांचे मराठींत अपभ्रंश जोडाक्षरें फोडून होतात.
रगत म्हणजे तांबडा असा अर्थ आहे. लालरगत हें मराठींत जोडविशेषण मुसुलमानकालीं बनलें आहे. (भा. इ. १८३६)
रगतगळू [ रक्तगुल्म = रगतगळूं ] (भा. इ. १८३६)
रंगाथिल (ला-ली-लें) [ रंगान्वित + ल (स्वार्थे) = रंगाथिल ( ला-ली-लें) ] coloured.
रंगाथिले [ रंगान्वित + ल = रंगाथिलें ] रंगविलेलें.
रटरटणें [ रट्ट परिभाषणे ] रटरटणें (भात वगैरेंचें ). (ग्रंथमाला)
रटाळ, रट्याळ [ रटालु = रटाळ, रट्याळ ] रटाळ, रट्याळ म्हणजे व्यर्थ बडबडणारा किंवा वटवटात्मक.
रट्टा [ अरत्नि (elbow) = रट्टा ] हाताचा रट्टा मारलान्
रंडगोळक [ रंडागोपालक ] (कुंडगोळक पहा)
रडतान [अनध्यायो रुद्यमाने समवायो जनस्य च ॥ १०८ ॥ (मनु-चतुर्थाध्याय)
रुद्यमाने रोदनंध्वनौ । भावे लकार:। (कुल्लूक ) रडतांना पढूं न ये, या वाक्यांत रडतांना हें रूप भावे रडतान या कृदन्ताचें सप्तमीचें रूप आहे. मराठींत भावे, कर्मणि व कर्तरि एकच रूप होतें. ] (भा. इ. १८३४) म. धा. २२