Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
मुरदाडशेंग [ मृद्दारशृंगकं = मुरदाडशिंग = मुरदाडशेंग ]
मुरम [ मुरगंड ] (मुरुम पहा )
मुरांबा [ मूर्ताम्ल: ] (मोरावळा पहा)
मुरुम [ मुरगंड pistules on the face = मुरुम, मुरम ] मुरमाची पुटकळी.
मुरूम [ मुरमंड (मुरगंड) eruption on the face = मुरूम ] eruption on the face. मुरुमाची पुटकुळी a boil of मुरुम.
मुर्गी [ मृगी ] (मिर्गी पहा)
मुर्दुंग्या [मुदंगिक = मुर्दुंगिअ = मुर्दुंग्या ] (भा. इ. १८३२)
मुर्मुरे [ मुर्मुर = तुसांवर किंवा पानांच्या पाचोळ्यावर किंवा भुसावर भाजलेलें भात. मुर्मुरक = मुर्मुरा ] (भा. इ. १८३२)
मुर्वत [ मुर्व् बन्धने. मुर्वतिः tie = मुर्वत ] त्याला मुर्वत नाहीं म्हणजे माणुसकीचें वगैरे बंधन नाहीं.
मुलगा [ मूलक ] (पोरगा पहा )
मुलगा-गी-गें [ मूल् (मोलयति, बीं पेरतो ) + अ = मल, मुलगा-गी-गें ( बीजारोपणाचें फल ) ] (स. मं. )
मुलूख (मूर्ख ) [ मूर्ख याचा सौरसेनींत अपभ्रंश विकल्पानें मुरुख्ख होतो. महाराष्ट्रीची मराठी बनतांना मुरुख्ख याचा अपभ्रंश मुलूख.]
उ० - तो साच्या मुलखाच्चा शहाणा आहे. येथें मुलखाचा म्हणजे मूर्खाणाम्. मुलूख म्हणजे प्रांत असा अर्थ नाहीं. मुलूख म्हणजे प्रांत हा अरबी शब्द आहे.
तो सार्या मुलखाचा शहाणा याचें शब्दशः संस्कृत भाषांतर ' स सर्वेषां मूर्खाणां विचक्षणः अस्ति ' असे आहे. (राधामाधव विलासचंपू पृ. १६३)
मुसमुशित [ मृत्स्नमृत्स्नित = मुसमुशित ] (भा. इ. १८३४)
मुसकी [ मुष्क: (अंडकोशः ) मुसक. स्त्रीलिंग (मराठी) मुसकी ] गवादी मांजराची मुसकी वैदू लोक विकतात. मुसकी म्हणजे अंडकोश. (भा. इ. १८३४)
मुसळ्या [ मुसल्य: = मुसळ्या ] इतर सूक्ष्म यंत्रानें काम न करतां ओबडधोबड यंत्रानें काम करतो तो मुसळ्या.
मुसळानें मारण्यास योग्य असा मुसल्य शब्दाचा संस्कृतांत अर्थ आहे. परंतु मराठींत तो अर्थ नाहीं.
मुळमुळित [ मृदुलमृदुलित = मुळमुळित ] softish.
मुळा [ मुलक = मुळा ] (भा. इ. १८३४)