Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
मागें १ [ माग्रं = मागां. माग्रे = मागे. माचिरं, माविलंबितं या अव्ययांप्रमाणें अग्रेच्या उलट माग्रे व अग्रंच्या उलट माग्रं अशीं अव्ययें संस्कृतांत होतात. ] (भा. इ. १८३६ )
-२ [ मार्गे = माग्गे=मागे=मागँ. पृष्टिमार्गे = पाठिमाग्गे= पाठीमागे = पाठिमागेँ. मागचा, मागून, मागां, मागुता ] (ग्रंथमाला)
माघोत (ता-ती-तें ) [ माग्रभूत = मागउत = मागौत, माघोत (ता-ती-तें) ] माघौत म्हणजे पश्चात् भूत. आगे मागे असें मराठींत म्हणतात, आगे म्हणजे अग्रे व मागें म्हणजे माग्रे. आगेच्या उलट मागें. ( ज्ञा. अ. ९ पृ. ६२ )
माघोतीं [ माग्रभूतं ] ( मागुतीं पहा )
माच करणें [ मज् उन्मादे ] म्हैस माच करत्ये. (माज पहा )
माचा [मंचक = माँचा = माचा ]
माज [ मज् उन्मादे ]
माजण [ मस्ज् ६ मज्जने. मज्जन = माजण ( मानभावी शब्द ) ] ( धा. सा. श. )
मांजर [ मार्जार = मंजर (महाराष्ट्री) = मांजर. मार्जार = मांजार (Vulgar)
माजाड [ मध्यास्थि = माजाडी = माजाड (कंबर). मध्यकटं = माजाड (कटिमध्य ) ]
मांजार [ मार्जार ] ( मांजर पहा)
माझ [ मदीय झा-झी-झें. मदीया = माझी. मम = मज्झ = मज हें तिन्ही लिंगीं सारखें. मह्य = मज्झ = माझ. एका कालीं सं. षष्टी मह्य अशी होती. (प्रांतिक किंवा पूर्ववैदिक) ] (ज्ञा. अ. ९ ट्र. २, ३ )
माठ [ मंथः = मांठ ] मातीचें भांडें.
माठर [ मंथर = माठर ] हा गडी माठर आहे म्हणजे मंद आहे.
माडणा [ मर्द् - मर्दना-नी ] ( मादना पहा)
माडळ [ मर्दल = माडळ ] एक वाद्य आहे.
मांडा [ मंडकः = मांडा. अत्युष्णो मंडकः पथ्यः ( शार्डधरसंहिता ) ]
माडी [ माडि: (राजवाडा) = माडी ]
मांडी १ [ मंड: (अग्रभाग:) = मांड. मंडिका (अगभाग:) = मांडी ] सक्थीचा अग्र म्हणजे पुढचा भाग तो मांडी.
-२ [ (बैठक मांडण्याचा किंवा घालण्याचा अवयव) = मांडी (मांडणें धातूपासून ) ] ( स. मं.)