Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

" परमभट्टारक-महाराजाधिराज-परमेश्वर-श्री-बप्पपादानुध्यातः ”

ह्या पदांचें डॉक्टर फ्लीट येणेंप्रमाणें इंग्रजी भाषांतर देतात :-
" Who meditated on the feet of the परमभट्टारक, महाराजाधिराज and परमेश्वर “ his glorious father ”. म्हणजे बप्प या शब्दाचा अर्थ father असा डॉक्टर फ्लीट करतात. हा शब्द जुना प्राकृत म्हणजे महाराष्ट्री आहे, संस्कृत नाहीं, असेंही डॉक्टर सांगतात. इतकेंच नव्हे, तर त्यापासून मराठी बाप शब्द निघाला असेंही स्पष्ट सुचवितात.

बापाला गौरवानें पितृपादाः असें म्हणण्याची चाल होती तीच बप्पपादाः या महाराष्ट्रीसंस्कृत सामासिक शब्दांत दिसून येते.

बप्प = पितृ

हा बाप शब्द इतरही आणीक अनेक काश्मीर कांची वगैरे देशांतील ताम्रशिलालेखांतून सांपडतो. मेवाडच्या गुहिलवंशाचा मूलोत्पादक जो पुरुष (A. D. ७३५) त्याचेंही नांव बप्प होतें. शक ४०५ मधल्याही एका ताम्रपटांत ( C. I. I. Vol. III, No. २२) बप्प शब्द आलेला आहे; आणि तो आणखी विशेषनाम म्हणून आलेला आहे. म्हणजे शक ४०५ च्या अगेदर बरीच शतकें हा शब्द सामान्यनाम म्हणून प्रचलित असला पाहिजे. तात्पर्य, शातवाहनांच्या कालीं महाराष्ट्रांत हा शब्द होता. निदान शक ४०५ च्या सुमारास चांगलाच प्रचलित होता.

एवंच बाप या शब्दाची महाराष्ट्री बप्प या शब्दापर्यंत पिढी लागली.

कादंबरीच्या उत्तरभागारंभीं बाणतनयानें खालील उद्गार काढले आहेत:-
वीजानि गर्भितफलाने विकाशभांजि
वप्त्रैव यान्युचितकर्मबलात्कृतानि ।
उत्कृष्टभूमिविततानि च यांति पोषं
तान्येव तस्य तनयेन तु संहतानि ॥

येथें वप्तृ या शब्दाचा अर्थ पिता असा आहे. शिवाय कोणत्याही चांगल्या कोशांत वप्तृ या शब्दाचा अर्थ पिता, बीजी असा सांपडेल.

एवंच, संस्कृत वप्तृ, महाराष्ट्री बप्प व मराठी बाप अशीं तीन रूपें आपल्या पुढे आहेत. तिहींचा अर्थ पिता असा आहे. पैकीं महाराष्ट्री बप्प व मराठी बाप ह्या शब्दांची आदेशप्रक्रिदा सर्वमान्य आहे. संयुक्तक्षरपरत्वामुळें मागील स्वराला दैर्घ्य येऊन संयुक्ताक्षर असंयुक्त झालें आणि बप्प चें बाप झालें.