Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

बात १ [ वार्ता = वत्ता = बत्ता = बात ] हकीकत. (भा. इ. १८३४)

-२ [ व्याघात = बाहात = बात ] अडथळा. हें काम होणार नाहीं म्हणजे काय बात आहे = काय अडथळा आहे ? (भा. इ. १८३४)

बातमात [ वार्त्तामात्रं = बातमात ]

बातल, बाताड्या [ वातिकः ] (बात्या पहा)

बातुकली [ व्यात्युत् + केलि mutual sport = बातुकली, भातुकली. (वि + आ + अति+उत्) ] पोरांची भातुकली girl's mutual sports.

वात्या [ वातिकः = बात्या ] वातिक म्हणजे धूर्त. गीतनृत्यहसितैः उन्मत्ततां आवहंति वातिकाः ।
(बाण-हर्षचरित-चतुर्थोश्वास, पृष्ठ १३८, निर्णयसागर) बात्या, बाताड्या, बातल हीं ह्या शब्दाचीं रूपें आहेत. (भा. इ. १८३५)

बादली १ [ वार्दोलिका = बादोली = बादली ] बादली म्हणजे विहिरींतून पाणी काढण्याचा डोल.

-२ [ फालं कार्पासं बादरं (अमर-द्वितीयकांड-नृवर्ग १११) ] बादर म्हणजे कापसाचें वस्त्र, कापड. बादरकं = बादल (ला-ला-लें). मराठशाईंत आहेरार्थ बादली देत असत. (भा. इ. १८३४)

बांध [ बंध = बांध (नदीचा) ] (भा. इ. १८३४)

बांधवणें, बांधावणें [ बध् १० संयमने. बंधयति = बांधवणें, बंधापयति = बांधावणें ] ( धा. सा. श.)

बांधा [ बंधक = बांधा (लागाबांधा ) ]

बांधें [ वंदा = बांधा, बांधें ] बांधें म्हणजे वृक्षादनी.

बांधेसूत [ बद्धसूत्र = बाधसूत = बांधेसूत. बंधसूत्रित = बांधेसूत ]