Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

बाज १ [ बाह्या = बाज, बाजलें ] बाजेवर बसून नद्या तरुन जात.

-२ [मंचिका = बाजी = बाज = बाज ] वाज ( खाट) शब्द ज्ञानेश्वरींत येतो.

-३ [ भज् १ सेवायां. रंजाभाज: = रंडीबाज. गंजाभाजः = गांजेबाज. अहिफेनभाजः = अफीणबाज. स्मश्रुभाजः = मिशाबाज इ. इ. इ.]
बाज हा फारशी हि शब्द आहे, परंतु वरील शब्दांत तो नाहीं. शिवाय फारशी बाज शब्द संस्कृत भाज शब्दाचाच अपभ्रंश आहे. (धा. सा. श. )

बाजत् [ बाह्यतः = बाजत् ]

बाजा [ वाद्यः = बाज्जा = बाजा ] वाद्यं कुरु = बाजा कर.

बाजारबसवी [ भार्यारु + उपवेशिनी = बाजारबसवी ] दुसर्‍याच्या स्त्रीच्या ठाई प्रजोत्पादन करणारा असा जो त्याला अनुरक्त जी स्त्री तिला बाजारबसवी म्हणत. दुकानांचा समूह जो बाजार त्याशीं येथें वस्तुतः संबंध नाहीं. ( भा. इ. १८३७)

बाजीकरी [ व्याजीक्रिया = बाजीकिरी = बाजीकरी = बाजीगरी ] व्याजीकरण म्ह० फसवणूक.

बाजीगरी [ वाजीक्रिया = बाजीगरी ] मंत्रौषधिक्रिया.

बाजीराव [ वत्सस्य पुत्रः वात्सिः ॥ वात्सि = वाच्चि = बाची = बाजी. वात्सिराजः = बाजीराव ]

बाजें [ बाह्यं = बाजे, बाजें ] बाहेरील. बाजा गोष्टी काय कामाची ?

बाट्या [ व्रात्यः = बाट्या ]

वाठी [ बीजाष्टिः (वीज + अष्टिः) = बिआठि = ब्याठि = बाठी ] आंब्याची वाठी.

वाड [ बद् १० भाषायां ] ( धातुकोश-वाड पहा)

बांड १ [ वंड् to cover =वंड: = बांड] लुगडें धडोतीचें.

-२ [ वंठ: (अविवाहित तरुण पुरुष) = बांड ] तरणा बांड म्हणजे तरणा अविवाहित पुरुष.

-३ [ बन्धकी ] (बांडगी पहा)

बांडगी [ बन्धकी = बांडकी = बांडगी, बांड ] ती बांड आहे म्हणजे पुंश्चली आहे. (भा. इ. १८३४)

बांडगुळ १ [ वंदागुल्मं = वांडगुळ = बांडगुळ ] वंदा म्हणजे वृक्षादनी.

-२ [ वनगुल्मः ] (वाणगुळ पहा)

बाडा [ बद् १० भाषायां ] ( धातुकोश-वाड पहा)

बाणगुळ [ वनगुल्मः = वणगुळ = वाणगुळ = बांडगुळ ]