Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
नंतर [ अनंतर = नंतर. येथें प्रारंभींच्या अचा मराठींत येतांना लोप होतो ] (भा. इ. १८३२)
नथ १ [ नस्तिका = नथ्थिआ = नथ ] (भा. इ. १८३६ )
-२ [ नाथः नासारज्जुः ( सिद्धांतकौमुदी ३-२-२४ ) नाथिका = नथ ( अलंकारविशेष ) ]
नथ्या [ नस्तितः = नथ्थिआ = नथ्या ] मराठींत नाक टोंचलेल्या मुलाला नथ्या म्हणतात. मूल जगावें म्हणून नाक टोंचतात. ( भा. इ. १८३६ )
नना [(वैदिक) नना (आई) = नना ] मराठींत आईला मुलें नना, नानी या शब्दांनीं हाका मारतात. (भा.इ. १८३७)
नन्नाचा पाडा [ अनन्वयस्य पाठ: = नन्नाचा पाडा ] ज्यांत अन्वय नाहीं तो अनन्वय पाठ. (भा. इ. १८३६)
नपेक्षां [ अनपेक्षा = नपेक्षा. तृतीया नपेक्षां] गोविंदा आला तर बरें; नपेक्षां तुं निघून जा. येथें नपेक्षां हें अव्यय आहे; व त्याचा अर्थ त्याच्या येण्याची अपेक्षा न धरतां, असा आहे. (भा. इ. १८३४)
नरडी [नर्दी (नर्द् = शब्द करणें, ज्या अवयवाच्या द्वारें शब्द होतो तो ) ] (स. मं.)
नर्डी [ नर्द् १ शब्दे. नर्दि: = नर्डी ] शब्द करण्याचा अवयव्.
नवट [ नविष्ठ = नवट (तमभाव)] नवट म्ह० अति नवें. ( भा. इ. १८३७)
नवती १ [ नव्यता = नवती ] तारुण्य.
-२ [ नवजातिः = नवआति = नवाति = नवती ] नवतीचीं पानें म्हणजे नूतन फुटीचीं कोवळीं विड्याचीं पानें.
नवथर [ नवतरं = नवथर (क्रियाविशेषण ) त = थ]
नवरी [ नववरिका a newly married girl = नवरी ]
नवानवश्याचा [ नमस्यति Freq नंनमस्यतिः नंनमस्यः = नवानवश्याचा ] one obtained through excessive prayer. nothing to do with नवा new.
नवाळी [ नवकालता = नवआली = नव्हाळी, नवाळी ] नव्हाळी म्हणजे तारुण्य.
नवीनवाळ [ नवनवकालः = नवनवाळ = नवीनवाळ ] नवीनवाळ म्ह० पहिला हंगाम.
नव्हाळी [ नवकालता ] (नवाळी पहा)
नव्हे [नभ् १ अभावे. नभ = नव्ह = नाह] मी नव्हे, मी नाहीं = अहं नभामि. (धातुकोश नह १ पहा)