Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
नक्कल [(सं.) नक्कणं - नक्कल. ण = ल] नक्क म्हणजे निर्मूल करणें. त्याचें नक्कल झालें म्हणजे त्याचें निर्मूल झालें. (भा. इ. १८३७)
नक्की १ [ निष्क्] ( निकें २ पहा)
-२ [ निक २ पहा]
नक्षा १ [ नक्ष् १ गतौ. नक्षः ]
-२ [ णक्ष् गतौ. नक्षः = णक्षा, नक्षा ] नक्षा, णक्षा उतरणें म्हणजे गति, उत्कर्ष बंद करणें. ( धा. सा. श.)
नख १ [ नख = नख ] (स. मं.)
-२ [ नखं ( छुरिका) = नख ] पोराचा नख लावून जीव घेतला, येथें नख म्हणजे सुरी असा अर्थ आहे.
नखरा [ फारसी ] ( स. मं.)
नखरुख [ नखवृक्ष = नखरुख (वृक्षविशेष) ] (भा. इ. १८३७)
नखरूड [ नखरुज् = नखरुड ( रोगविशेष ) ज = ड ] (भा. इ. १८३७)
नखला १ [ नखर: = नखला ]
-२ [( व्याघ्र) नखवल्ली = नखली = नखला ]
नखुरडें [ नखर + ट = नखुरडें ]
नखुर्डे [ नख शब्दाचें र्हस्वत्वदर्शक रूप ] (स. मं.)
नखोली [नखगूलिका = नखोली ] गव्हाच्या भिजवलेल्या कणिकेच्या नखानें केलेल्या गोळ्या.
नग १ [न + कृग्] ( घातुकोश-नक पहा)
-२ [ नकिः (वर्जने निपातः) = नगि= नग ( अव्यय)] (भा. इ. १८३४)
नंगा [ न्यंगः = नंगा. कौटिल्य अर्थशास्त्र ]
नंगा नाच = न्यंगं नर्तनं.
न्यंग म्हणजे कुरूप. नागा = नग्न पासून निघाला आहे.
नंगा नाच १ [ अनंग (नृत्यं ) = नंगा (नाच) ]
-२ [ अनंग नर्तन = नंगनाच = नंगानाच ] (भा. इ. १८३६)
नगे, नगेत [ न + कग्] ( धातुकोश-नक पहा)
नजर [ फारसी ] (स. मं.)
नटू बाई नटू [ नट् १ नतौ ] (धातुकोश-नट ३ पहा)
नडणें, नाडणें - [नडनं = नडणें. नाडयति (णिच्) = नाडणें ] नडणें म्हणजे पडणें व नाडणें म्हणजे पाडणें.
नी नडलों म्हणजे संकटांत पडलों. (भा. इ. १८३७)