Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
दधात १ [ दध् १ दाने ] ( ददात पहा)
-२ [ दद्यात् = दधात ] (ग्रंथमाला)
दध्या [ ( दध्ना भक्षयति ) दाधिकः = दध्या ] (दह्या पहा)
दबदबा [ दरीदर्पः = दबदबा. दृप् to pride ] magesty, awefulness.
दब्ब [ स्तब्ध = थब्ब = डब्ब = दब्ब ] wellstuffed
दमट [ द्रविष्ट ] ( धातुकोश-दमट २ पहा)
दमडी [ द्रम्म ] ( द्रम्म पहा)
दमदमित [ दंदम्यित = दमदमित. दम् ४ उपशमे ] दमदमित जेवण झालें = भूक शमेलसें जेवण झालें.
दमा [ ध्मा ] ( धातुकोश-दम ३ पहा)
दयाळ (प्रिय) [दयित + ल (स्वार्थक) = दइअल = दयाळ (ळा-ळी-ळें ) ] लावण्यांत व कवितेंत दयाळा
(संबोधन, पुल्लिंग) दयाळे (संबोधन, स्त्रीलिंग) हे शब्द येतात व त्यांचा अर्थ प्रिया, प्रिये असा आहे. दयाळु (मायाळु) या शब्दाशीं या दयाळ शब्दाचा कांहीं एक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)
दरद १ [ दरत्स्त्रियां प्रपाते च भयपर्वतयोरपि (मेदिनी) दरत् (पर्वत) = दरड ] (भा. इ. १८३३)
-२ [ दलाढ्या = दलड = दरड = दलद ] नदीच्या तीरावरील चिखली जमीन.
दरदरून १ [दृ to split ] दरदरून घाम आला.
-२ [दर्दर्त्वा ( दृ vedik) to kill, hurt ) = दरदरून ] दर्दरून घाम सुटला म्हणजे वाजवीपेक्षां फाजील इजा करणारा घाम सुटला.
-३ [ दृ ९ विदारणे-दर्दरीति ](धातुकोश-दरदर १ पहा)
दर्शन [ दर्शनं नयनस्वप्नबुद्धिधर्मोपलब्धिषु इति मेदिनी ] रामदासांना रामाचें दर्शन झालें, या वाक्यांत दर्शन याचा अर्थ स्वप्न असा करणें उचित आहे.
दलद [ दलाढ्या ] (दरद २ पहा)
दंव [ द्रव = दव = दँव ] (भा. इ. १८३२ )
दवडत [ द्रवत् ( पळत, झटकर) = दवडत ] स आ वह देवान् द्रवत् ( १-९-४४-७)
दवली [ दार्विकावल्ली = दवली ] पाथरी.
दस्त १ [ दस्-दस्त (दस् नाश करणें ) ] त्यानें त्याला दस्त केलें म्हणजे त्याचा नाश केला.
फारसी दस्त शब्दाहून हा संस्कृत दस्त शब्द निराळा. ( भा. इ. १८३४)
-२ [ फारसी ] (स. मं.)